शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अक्षय वल्हाळच्या खुनाचा बदला; आरोपीच्या भावावर गोळीबार अन् कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 10:59 IST

पुण्याच्या बुधवार पेठेत बदल्याच्या भावनेतून खुनी खेळ

पुणे/ किरण शिंदे : पुण्यातील नाना पेठेत काही दिवसांपूर्वी अक्षय वल्हाळ या तरुणाची कोयत्याने आणि दगडविटाणे मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्यासाठी पुण्यातील बुधवार पेठेत मंगळवारी थरारक घटना घडली. अक्षयचा खून करणाऱ्या आरोपीच्या भावावर गोळीबार करून त्याच्यावर कोयत्याने वार करण्यात आले. बुधवार पेठेतील रामेश्वर चौकात हा सर्व थरार घडला. या घटनेत शेखर अशोक शिंदे (वय 32) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

फरासखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी रूपेश जाधव, गणेश इमुल, निरजन कटकम, कृष्णा बिंटलिंग व कृष्णा गाजुल व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेखर शिंदे याने तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,  गंभीर रित्या जखमी असलेल्या शेखरच्या भावाने काही महिन्यांपूर्वी नाना पेठ येथे अक्षय वल्हाळ याचा खून केला होता. त्या खूनाचा बदला म्हणून आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला. दरम्यान, मंगळवारी रात्री शेखर रामेश्वर चौकातून दुचाकीवरून निघाला होता. यावेळी पाठिमागून दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडविले. "तुझ्या भावाने आमचा मित्र अक्षय वल्हाळ याचा मर्डर केल्याचा बदला म्हणून आज तुझा मर्डर करणार आहे. जिवंत सोडणार नाही" असे म्हणून एकाने त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले व डोक्यात गोळीबार केला. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तेथून पसार झाले. 

दरम्यान भर वर्दळीच्या ठिकाणी हा प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली होती. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी अवस्थेत पडलेल्या शेखरला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकDeathमृत्यू