शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
2
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
3
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
4
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
5
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
6
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
7
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
8
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
9
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
10
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
11
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
12
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
13
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
14
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
15
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
16
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
17
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
18
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
19
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
20
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू

ठेवीदारांचे 18 लाख व्याजासह परत करा : डीएसकेंना ग्राहक मंचाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2019 8:16 PM

ठेवींची मुदत संपत आल्याने डीएसके यांच्या कंपन्यांनी त्यांना धनादेश दिले. मात्र, त्यातील काही धनादेश वटले नाहीत...

ठळक मुद्दे45 दिवसांची मुदत

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी  बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना ग्राहक मंचाने दणका दिला आहे.  ठेवीदारांनी गुंतवलेले 18 लाख 10 हजार रुपये त्यांनी व्याजासह 45 दिवसांत परत करावेत. याचबरोबर तक्रारदारांना झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासापोटी 25 हजार आणि तक्रार अर्जाच्या खर्चाचे 5 हजार रुपये देण्याचाही आदेश मंचाने दिला आहे. डीएसके हे सध्या येरवडा कारागृहात आहेत.मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, सदस्या क्षितिजा कुलकर्णी आणि संगीता देशमुख यांनी हा निकाल दिला. याबाबत अतुल दत्तात्रेय रालेभट आणि कल्पना दत्तात्रेय रालेभट (रा. राष्ट्रभूषण चौक, पुणे) यांनी डीएसके कन्स्ट्रक्शनच्या तीन कंपन्यांविरोधात जून 2017 मध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारदारांनी डीएसके यांच्या डी. एस. कुलकर्णी अँण्ड ब्रदर्स, डी. एस. कुलकर्णी अण्ड असोसिएट्स आणि डी. एस. कुलकर्णी बिल्डर्स या तीन कंपन्यांमध्ये 18 लाख 10 हजार रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. त्याबदल्यात त्यांना दर वर्षी 12 टक्के दराने व्याज मिळेल, असा करार त्यांच्यात झाला होता. ठेवींची मुदत संपत आल्याने डीएसके यांच्या कंपन्यांनी त्यांना धनादेश दिले. मात्र, त्यातील काही धनादेश वटले नाहीत. याबाबत कंपन्यांकडे चौकशी केली असता, त्यांनी मंदीचे कारण दिले. त्यामुळे तक्रारदारांनी मंचात दावा दाखल केला होता. डीएसके यांच्या वतीने वकील मंचासमोर हजर झाले, मात्र त्यांनी लेखी म्हणणे सादर केले नाही. सेवेत दोष असल्याचा निष्कर्ष मंचाने काढला. त्यानुसार डीएसके यांनी तक्रारदारांना 18 लाख 10 हजार रुपये, 1 लाख 8 हजार रुपयांच्या व्याजासह 45 दिवसांत परत करावेत, असा आदेश मंचाने दिला. 

टॅग्स :PuneपुणेD.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस