शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! निवृत्त न्यायाधीशांनी घेतला सहा महिन्यांची पेन्शन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचा निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 19:24 IST

तुम्ही जर शंभर माणसांना अन्न देऊ शकत नसाल तर किमान एकाला का होईना अन्न देऊन त्याची भूक भागवू शकता.

ठळक मुद्देपत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी 

पुणे : कोरोनामुळे राज्यभर लॉकडाऊनची गंभीर परिस्थिती असताना यात गरजवंतांना मदत करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, संघटना, दानशूर व्यक्ती पुढे येत आहे. अशातच माजी न्यायाधीश जी.डी.इनामदार यांनी देखील आपले सहा महिन्याचे निवृत्ती वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र आपला मनोदय व्यक्त केला आहे. १ मे ते ३० सप्टेंबर या काळातील पेन्शन त्या सहायता निधीसाठी वापरण्यात यावे. असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. तुम्ही जर शंभर माणसांना अन्न देऊ शकत नसाल तर किमान एकाला का होईना अन्न देऊन त्याची भूक भागवू शकता." मदर तेरेसा यांचा हा विचार आपल्या पत्रात उद्धृत करत माजी न्यायाधीश इनामदार यांनी कोरोनाच्या सध्याच्या भयानक परिस्थितीचा उल्लेख त्यात केला आहे.मे ते सप्टेंबर पर्यत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपल्या पेन्शन खात्यातून दरमहा २०हजार रुपये वर्ग करण्याची विनंती सोलापूर येथील जिल्हा ट्रेझरी विभागाला करण्यात आली आहे. अशारितीने १ लाख रुपयांची मदत त्यांच्याकडून केली जाणार आहे. प्रशासन योग्य रीतीने आपली भूमिका बजावून आपले काम चोखपणे पार पाडत आहे. अशावेळी आपल्या सर्वांना 'कोरोना' आजाराचा समर्थपणे मुकाबला करायचा आहे. त्यासाठी सवार्नी योग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. याबाबत अधिक माहिती देताना माजी न्यायाधीश जी.डी. इनामदार म्हणाले, राज्यातील कुठलाही नागरिक उपाशी राहू नये अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. त्यांनी व्यवस्थितरित्या सर्व परिस्थिती हाताळली आहे. यावेळी एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही समाजाचे काही देणे लागतो. या जाणिवेतून मदत करण्याचे ठरवले. अद्याप अनेकांना जेवण मिळण्यासाठी धडपड करावी लागते. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. म्हणून फुल ना फुलाची पाकळी या भूमिकेतून मदत केली आहे. देशाचा नागरिक आणि राज्याचा रहिवासी म्हणून हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. याची आठवण मनात बाळगायला हवी.

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसChief Ministerमुख्यमंत्रीfundsनिधी