शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कामगाराची जिद्द मुख्याधिकारी होण्याची

By admin | Updated: January 26, 2015 01:15 IST

जुन्नर नगरपालिकेत गटार सफाईकाम करणारा तरुण... परिस्थितीवर मात करून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतो. पूर्व व मुख्य परीक्षेत यश संपादन करतो;

आनंद कांबळे, आपटाळेजुन्नर नगरपालिकेत गटार सफाईकाम करणारा तरुण... परिस्थितीवर मात करून तो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देतो. पूर्व व मुख्य परीक्षेत यश संपादन करतो; मात्र तोंडी मुलाखतीत अपयश येते. अपयशाला न घाबरता... पालिकेचा मुख्याधिकारी व्हायचेच, या ध्येयाने पुन्हा भरारी घेत आहे.जुन्नर शहरातील पाडळी येथे राहणारा तरुण अमित गणपत रोकडे हा बारावी पास झाल्यानंतर घरातील आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी पालिकेत २००४मध्ये गटार साफ करणारा कामगार म्हणून दाखल झाला. अमितच्या वर्गातील मुले महाविद्यालयीन शिक्षण घेत होती. महाविद्यालयाच्या रस्त्याकडील गटारे साफ करताना आपल्या मित्र-मैत्रिणी आपल्याकडे पाहतात, या जाणिवेने त्याला लाज वाटत असे. मात्र, मनात ध्येय घेऊन आपण काम करीत आहोत, याची जाणीव ठेवून तो सफाईचे काम प्रामाणिक करीत आहे.गटारे साफ करणे हे कमी दर्जाचे काम आहे; मात्र मला अधिकारी व्हायचेच, या उद्देशाने आपण हे काम करीत आहोत. त्याकरिता त्याने बहि:स्थ शिक्षण घेऊन एम.ए. (राज्यशास्त्र) पदवी घेतली. एका कार्यक्रमात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी सांगितले, की कोणतेही काम कर; पण जिद्द सोडू नकोस. अमितने या सल्ल्यानुसार राज्य सेवा परीक्षा देण्याची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात पीएसआय (फौजदार) परीक्षेत त्याने पूर्व व मुख्य परीक्षेत यश संपादन केले. मात्र, तोंडी परीक्षेत अपयश आले; पण ‘जिद्द सोडू नकोस,’ हा सल्ला लक्षात घेऊन तो सेल टॅक्स व राज्य आयोगाची पुन्हा जोरदार तयारी करीत आहे.सकाळी गटारे साफ करायची, सकाळ सायंकाळी ६ ते रात्री ९.३० या वेळात श्री शिवछत्रपती महाविद्यालयाच्या अभ्यासिकेत जाऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, हे त्याचे नित्याचे सुरू आहे.