शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

पुणे मेट्राेनं गल्लीबाेळात स्टेशन आणलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 14:02 IST

कसबा पेठ रहिवासी नियाेजीत मेट्राे स्टेशन विराेधी संघाच्या वतीने फडके हाैद चाैकात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. मेट्राे स्टेशन हटावं मुळ पुणे बचाव अशा घाेषणा यावेळी देण्यात आल्या.

पुणे : पुण्यातील मेट्राे काम वेगात सुरु आहे. नरेंद्र माेदींनी तर काही दिवसांपूर्वी हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्राे मार्गाच्या भूमिपूजन कार्यक्रमात 2019 मध्ये पुण्यात मेट्राे धावू लागेल अशी घाेषणा देखील केली. परंतु कसबा पेठेत मेट्राेचे स्टेशन उभारण्यासाठी आता कसबा पेठेतील रहिवाशांनी विराेध केला आहे. कसबा पेठ रहिवासी नियाेजीत मेट्राे स्टेशन विराेधी संघाच्या वतीने फडके हाैद चाैकात ठिय्या आंदाेलन करण्यात आले. यावेळी माेठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित हाेते. काळे झेंडे दाखवत कसबा आमच्या शिवबाचं नाही काेणाच्या बापाचं अशा घाेषणा देण्यात आल्या. तसेच कसबा पेठेत मेट्राेचे स्ठेटन करु नये अशी मागणी करण्यात आली. 

    मेट्राेच्या पहिल्या आराखड्यात मेट्राेचे स्टेशन हे बुधवार पेठेत हाेते. आत हे स्टेशन कसबा पेठेत करण्याचे नियाेनजन करण्यात आले आहे. कसबा पेठेला माेठा ऐतिहासिक वारसा आहे. अनेक प्राचीन मंदिर आणि मस्जिद या मेट्राे स्टेशनमुळे बाधीत हाेणार आहेत.  मेट्राे कंपनी ही प्राचिन मंदिरं आणि येथील नागरिकांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न करीत आहे. असा आराेपही यावेळी करण्यात आला. कुठल्याही परिस्थितीत येथे मेट्राे स्टेशन हाेऊ देणार नाही असा निर्धार येथील नागरिकांनी केला आहे. मुळ पुणे म्हणजे कसबा पेठ खुद्ध झांबरे पाटलांनी राजमाता जिजाऊ यांना लाल महाल बांधण्यास जागा दिली. हा इतिहास माहित नसणाऱ्यांनी कसबा पेठ येथे स्टेशन प्रस्तावित केले. असे लिहीलेले फ्लेक्सही ठिकठिकाणी लावण्यात आले हाेते. तसेच चाैकात माेठा फ्लेक्स लावून मेट्राे स्टेशन हटाव मुळ पुणे बचाव असे त्यावर लिहीण्यात आले हाेते.

      याबाबत येथील रहिवासी असलेले प्रमाेद कवडे म्हणाले, या भागातील आधीचे स्टेशन हे बुधवार पेठेत प्रस्तावित हाेते. नंतर ते कसबा पेठेत करण्यात आले. कसबा पेठेपासून शिवाजीनगर आणि मंडई ही दाेन्ही मेट्राे स्थानके जवळ आहेत. तसेच येथे हाेणाऱ्या मेट्राे स्टेशनमुळे येथील ऐतिहासिक वारशाला धक्का बसणार आहे. त्याचबराेबर येथील शेकडाे लाेक बाधीत हाेणार आहेत. या मेट्राे स्थानकामुळे येथील झांबरे चावडी देखील बाधीत हाेणार आहे. या चावडीत शिवकाळापूर्वीपासून न्यायनिवाडा हाेत असे तसेच झांबरे पाटील यांनी स्वतः जिजाऊंना लाल महाल बांधण्यास जागा दिली हाेती. त्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या इतका महत्त्वाचा हा भाग असताना येथे मेट्राे स्टेशन करण्याचा घाट घातला जात आहे. कसबा पेठेला वारसा आहे. इथलं वेगळेपण येथील लाेकांनी अजूनही जपलं आहे. इथली संस्कृतीला या मेट्राे स्टेशनमुळे धक्का लागणार आहे. पुणे मेट्राे कंपनी गल्ली बाेळात मेट्राे स्टेशन करत आहे. त्यामुळे येथे हाेणाऱ्या मेट्राे स्थानकाला आमचा तीव्र विराेध आहे.     अमजद शेख म्हणाले, या मेट्राे स्टेशनमुळे अनेक ऐतिहासिक मंदिरांबराेबरच येथे असलेली चारशे ते पाचशे वर्षापूर्वीची मस्जिद पाडण्यात येणार आहे. त्याचबराेबर इथल्या शेकडाे लाेकांना आपलं घर साेडावं लागणार आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट म्हणतात कसबा स्टेशनला काही मूठभर लाेकांचा विराेध आहे. पालकमंत्री लाेकांची दिशाभूल करत आहेत. कसबा पेठेची संस्कृती जपायलाच हवी. त्यामुळे येथील प्रस्तावित मेट्राे स्टेशन रद्द करण्यात यावे. 

टॅग्स :Metroमेट्रोgirish bapatगिरीष बापटPuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज