चार वर्षांपासून प्रजासत्ताक साजरा होतच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:12 IST2021-02-05T05:12:51+5:302021-02-05T05:12:51+5:30
-- लोणीकंद: गेल्या पंधरा वर्षांपासून पेरणे (ता. हवेली) येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे, येथे ...

चार वर्षांपासून प्रजासत्ताक साजरा होतच नाही
--
लोणीकंद: गेल्या पंधरा वर्षांपासून पेरणे (ता. हवेली) येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहे, येथे तब्बल दोन वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक १७ व चार शिपाई, आशासेविका २० असे कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. शिवाय पेरणे, तुळापूर, फुलगाव, भावडी,वढु खुर्द, लोणीकंद, बकोरी आणि डोंगरगाव आदी आठ गावांत व वाड्या-वस्त्यावर वैद्यकीय सेवा पुरवली जाते. येथू चार वर्षांपूर्वी सातत्याने प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिन साजरा केला जात होता. मात्र, गेल्या चार वर्षांपासून त्याला खंड पडला असून राष्ट्रीय सण म्हणजे केवळ सुट्टीचा दिवस ठरला आहे त्यामुळे ध्वजारोहणाच्या जागेची दयनीय अवस्था झाली असून त्यामुळे गावामध्ये नाराजीचे वातावरण आहे. गावामध्ये ग्रामपंचायत, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, बालवाडी, अंगणवाडी येथे प्रजासत्ताक दिनाची धामधूम चालू असताना प्राथमिक आरोग्य केंद्र सुनसुने वाटत होते. आज दिवसभर गावात चर्चेचा विषय होता. सरपंच रुपेश ठोंबरे यांनी त्याला दुजोरा दिला. ठोंबरे म्हणाले की, देशप्रेम व देशभक्ती कुणाला सांगावी व शिकवावी लागत नाही. भारतीय संविधाने राज्य कारभार सुरू झाला. तो गणतंत्र दिवस आपण साजरा करतो. प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कर्मचारी प्रजासत्ताक दिन साजरा करत नाही, हे खेद जनक आहे.
--
कोट
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ग्रामपंचायत व ग्रामस्थ चांगले सहकार्य आहे. पण, काही तांत्रिक अडचणीमुळे राष्ट्रीय सण झाला नाही, पुढच्या वर्षीपासून ही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केली जाईल.
डॉ. निलीमा इनामदार,
प्राथमिक आरोग्य अधिकारी
--
फोटो क्रमांक : २७लोणीकंद प्राथमिक आरोग्य केंद्र प्रसासत्ताक दुरवस्था (दोन फोटो )
फोटोओळी- पेरणे (ता. हवेली) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व शेजारी ध्वजारोहणसाठी बनवलेल्या स्तंभाच्या चौधऱ्याची झालेली दयनीय अवस्था (छाया के. डी. गव्हाणे)