शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

पुणे महापालिकेच्या सभेत ३७० वरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुगलबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 12:00 IST

काही सदस्यांनी काँग्रेसने जम्मू काश्मीर आपल्या देशापासून कसे वेगळे ठेवले हे देखील सांगितले.

ठळक मुद्देकेंद्र शासनाचा अभिनंदनाचा ठराव मांडून सभा तहकूब

पुणे : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री अमित शहा यांचा अभिनंदनाचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला. यावेळी सत्ताधा-यांनी मोदी, शहाचे कौतुक करत काँग्रेसवर टिका केली. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँगे्रसने ३७० कमल रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचा विकास होणार असल्याचा दावा कसा खोटा असल्याचे सांगितले. यामुळे  कलम ३७० वरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी, विरोधकांमध्ये चांगली जुगलबंदी रंगली.    अभिनंदनाच्या ठरावावर चर्चा करताना भाजपचे स्वीकृत नगरसेवक गोपाळ चिंतल, मंजुषा नागपूरे, माधुरी सहस्त्रबुध्दे, मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी मोदी आणि शहा यांचे अभिनंदन करत इतके वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न बहुमताने सत्तेवर येताच भाजपने घेतला. हे सांगताना काही सदस्यांनी काँग्रेसने जम्मू काश्मीर आपल्या देशापासून कसे वेगळे ठेवले हे देखील सांगितले. यावर काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक प्रशांत जगताप यांनी यापूर्वी काँग्रेसने जम्मू काश्मीरच्या जनतेच्या विकासासाठी, लोकांच्या हितासाठी काय-काय केले सांगितले. तसेच केंद्र शासनाने कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू काश्मीरचा कसा विकास होणार याचा केलेला दावा खोटा असल्याचा सांगितला. यावर उत्तर देताना स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि उपमहापौर डॉ.सिध्दार्थ धेंडे यांनी काँगे्रसच्या सदस्यांनी सांगितलेली माहिती खोटी असल्याचे सांगतिले. यामुळे अभिनंदनाच्या ठरावावर चांगलीच जुगलबंदी रंगली.--------------------------काँग्रेस सदस्यांमधील वाद सर्वसाधारण सभेत चव्हाट्यावरमहापौर मुक्ता टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेली मंगळावर (दि.२०) रोजीची सर्वसाधारण सभा जम्मू काश्मीरचे कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री अमित शहा यांचा अभिनंदनाचा ठराव मांडून सभा तहकूब करण्याचा प्रस्ताव प्रभारी सभागृहनेते सुनिल कांबळे यांनी ठेवला. याला विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी अनुमोदन दिले. परंतु महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारच्या सभेत प्रश्नोत्तराचा तास घेण्यात येईल, असे आश्वासन काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांना दिले होते. यामुळे सभा तहकूबीचा प्रस्तावर मांडताच बागवे यांनी हरकत घेतली. गेल्या तीन-चार महिन्यांपासून आपण प्रश्नोत्ताराचा तास घेण्याची मागणी करत आहोत. परतुं प्रत्येक वेळी सत्ताधारी जाणीपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत सभा सुरु ठेवण्याची मागणी केली. यावर तुमच्या पक्षाच्या गटनेत्यांच्या मंजूरीनंतरच सभा तहकूब करण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून बागवे आणि गटनेते अरविंद शिंदे यांच्यामध्ये काही प्रमाणात बाचाबाची झाली. या दोन्ही सदस्यांमध्ये असलेले वाद यानिमित्त सर्वसाधारण सभेतच चव्हाट्यावर आला.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाBJPभाजपाcongressकाँग्रेसAmit Shahअमित शहा