शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मतदार नोंदणीसाठी उरले काही तास; पुणे,बारामतीसाठी सोमवारपर्यंतची मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 7:17 PM

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर केली. त्यानंतरही शनिवारी व रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आली.

ठळक मुद्देपहिल्या व दुस-या टप्प्यात मतदान होणा-या लोकसभा मतदार संघातील मतदार नोंदणीच्या तारखा संपुष्टात ऑनलाईन मतदार नोंदणी करून घ्या 

पुणे: लोकसभा निवडणूकीसाठी मतदार नोंदणी करण्यास अवघे काही तास उरले आहेत.त्यामुळे काही कारणाने मतदार नोंदणी करण्याचे राहून गेले असल्यास पुणे व बारामती मधील नागरिकांना येत्या २५ मार्चपर्यंत तर शिरूर व मावळ मतदार संघातील मतदारांना ३० मार्चपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या कालावधीनंतर ऑनलाईनपध्दतीने मतदार नोंदणी अर्ज करता येणार नाही, असे निवडणूक आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.लोकशाही प्रधान देशात मतदार महत्त्वाचा घटक मानला जातो. या मतदाराने दिलेल्या अमुल्य मताच्या आधारेच लोकसभेच्या उमेदवारांचे भवितव्य ठरते. त्यामुळेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणीसाठी विविध कार्यक्रम राबविले. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी जिल्ह्यातील मतदार यादी जाहीर केली. त्यानंतरही शनिवारी व रविवारी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात आली.निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार नमुना अर्ज ६ भरून केली जाणारी मतदार नाव नोंदणी करता येते.परंतु,नामनिर्देशन ( उमेदवारी अर्ज ) दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे अर्ज निकाली काढून नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या शेवटच्या दिवसाच्या १० दिवस अगोदरपर्यंत प्राप्त झालेले मतदार नोंदणी अर्ज निकाली काढावेत, असे निर्देश राज्याचे उप सचिव व सह मुख्य निवडणूक अधिकारी अ.ना.वळवी यांनी सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिका-यांना दिले आहेत. त्यानुसार पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येत्या २५ मार्चपर्यंतच पुणे व बारामती मतदार संघातील मतदारांचे तर ३० मार्चपर्यंतच शिरूर व मावळ मतदार संघाच्या मतदारांचे अर्ज आॅनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. राज्यात चार टप्प्यात निवडणूका घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मतदार संघासाठी मतदार नोंदणीची अंतिम तारीख वेगळी आहे. पहिल्या व दुस-या टप्प्यात मतदान होणा-या लोकसभा मतदार संघातील मतदार नोंदणीच्या तारखा संपुष्टात आल्या आहेत. पुणे व बारामती मतदार संघाची निवडणूक तिस-या टप्प्यात असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ४ एप्रिल आहे. त्यामुळे या मतदार संघात केवळ २५ मार्चपर्यंतच मतदार नोंदणी करता येईल. तर शिरूर व मावळ मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ९ एप्रिल असल्यामुळे ३० मार्चपर्यंतच मतदारांना नाव नोंदणी करता येईल.त्यानंतर अर्जांची छाननी करून अंतिम मतदार यादी तयार केली जाईल. ----------------ऑनलाईन मतदार नोंदणी करून घ्या निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावरून आॅनलाईन पध्दतीने मतदार नोंदणी अर्ज स्वीकारला जात आहे. याच संकेतस्थळावर मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची तपासणी करता येते.जिल्ह्यातील नवमतदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नवमतदारच जिल्ह्यातील खासदार ठरवतील,असे बोलले जात आहे.

टॅग्स :PuneपुणेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदानonlineऑनलाइन