शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
2
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
4
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
5
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
6
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
7
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
8
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
9
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
10
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
11
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
12
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
13
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
14
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
15
मुक्ता बर्वेने या कारणामुळे अद्याप केलं नाही लग्न, स्वतःच केला खुलासा
16
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
17
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
18
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
19
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
20
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...

परदेशात छत्रपतींच्या आठवणींना उजाळा; दुबईत मुलांनी साकारली प्रतापगडाची प्रतिकृती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 7:40 PM

यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष म्हणून ओळखले जात असून या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी ३५० दिवे लावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

भानुदास पऱ्हाड 

आळंदी : दिवाळीचा सण म्हणजे फराळ, फटाके, आकाश कंदील व आप्तजनांच्या भेटीगाठी त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला (दुर्ग) बनवण्याची एक प्रथा आहे. आजकालच्या काळात ही प्रथा लुप्त होताना दिसत आहे. मात्र सातासमुद्रापार दुबईत स्थित असलेल्या प्रथा संस्थेने एक क्रांतिकारी उपक्रम राबवत प्रतापगडाची प्रतिकृती साकारून छत्रपतींच्या आठवणींना उजाळा दिला.            दुबईतील ममझार पार्कमध्ये प्रथा या संस्थेने 'प्रथा दुर्ग मोहीम' वर्कशॉप केला. दुबईत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय कुटुंबियांच्या मुलांना एकत्रित आणून वर्कशॉपच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांच्या गडकिल्ल्यांविषयी माहिती बालमित्रांना दिली. यंदाचे हे प्रथा दुर्ग मोहीमचे पहिलेच वर्ष असून प्रथा संस्थेने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचे ठरवले. सॉलिटेअर इव्हेंट्स या कंपनीने या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी सांभाळली.            यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष म्हणून ओळखले जात असून या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी ३५० दिवे लावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी भेट देत उपक्रमाचे तसेच लहान मुलांचे भरभरुन कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. प्रथा संस्थेचे संस्थापक सागर पाटील व त्रिविक्रम ढोल ताशा पथकातल्या सवंगड्यांना घेऊन त्यांनी ही आगळीवेगळी दुर्ग मोहीम राबवली. एक दिवस रंगलेल्या ह्या वर्कशॉप ची सुरुवात भूमिपूजनाने झाली. त्यानंतर किल्ल्याची आखणी व किल्याचे बांधकाम याचे प्रशिक्षण लहान मुलांना देण्यात आले. मातीचे मिश्रण करून त्याचा लेप किल्ल्याला लावण्यात आला. हुबेहूब प्रतापगडाची प्रतिकृती साकारण्यात आली. दुबईमध्ये लहान मुलांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला. त्यामुळे प्रथा या संस्थेचे कौतुक पालकांनी भरभरून केले.

 पाच मीटर लांबी व तीन मीटर रुंदी असलेली ही प्रतापगडची प्रतिकृती बनवायला साधारण आठ तास लागले. सुमारे ५० गोणी दगड व एक टन माती वापरण्यात आली असे प्रथा संस्थेचे संचालक सागर पाटील यांनी सांगितले. या मोहिमेमध्ये ३० लहान मुलांनी सहभाग घेतला. संपूर्ण आखाती देशातील पहिले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या तरुण वादकांनी यात स्वयंसेवक म्हणून दुर्ग बांधायला व लहान मुलांना ही प्रथा शिकवायला हाथभार लावला. 

टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजDubaiदुबईFortगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेक