शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना दिलासा; तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या देण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 12:03 PM

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार

पुणे : येत्या गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना विनाविलंब तात्पुरत्या नवीन वीजजोडण्या आणि तत्पर वीजसेवा देण्यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणची यंत्रणा सज्ज ठेवा. वीज सुरक्षेबाबत विशेष उपाययोजना करा, तसेच गणेश मंडळांना सुरक्षा ठेवीची (अनामत) रक्कम परत करण्याची कार्यवाही तातडीने करा, असे निर्देश मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. २८) पुणे परिमंडलातील पूर्वतयारीचा आढावा घेतल्यानंतर ते बाेलत हाेते. यावेळी अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, संजीव राठोड, तसेच कार्यकारी अभियंते उपस्थित होते.

हे आवश्यक

- पावसाची शक्यता असल्याने गणेश मंडळांनी संभाव्य धोके टाळण्यासाठी वीजयंत्रणेची योग्य काळजी घ्यावी.- मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था, संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडूनच करून घ्यावी.- मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.- स्वीच बोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या तात्पुरत्या वीजजोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे.- मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सूलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सूलेशन टेपने जोड देण्यात यावा.

...तर अपघाताचा धाेका 

गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीत प्रवाहित होतो. त्यातून विद्युत अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाइटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत, याची दैनंदिन तपासणी करावी, असे आवाहन सार्वजनिक गणेश मंडळांना महावितरणकडून करण्यात येत आहे.

नवीन वीजजोडणी देण्यात येणार 

गणेश मंडळांना तात्पुरती वीजजोडणी देण्याची कार्यवाही जलदगतीने झाली पाहिजे. ऑनलाइन अर्ज भरण्यासह इतर काही अडचणी येत असल्यास मंडळांना सहकार्य करावे. नवीन वीजजोडणी देण्यात येणार आहे, अशा सर्व रोहित्रांची व मिरवणुकांच्या मार्गावरील वीजयंत्रणेची पाहणी करावी. तसेच आवश्यकतेनुसार देखभाल दुरुस्ती करावी. गणेश मंडळांच्या सुरक्षा ठेवीची रक्कम त्यांना परत करण्याची कार्यवाही गणेशोत्सवानंतर एक ते दोन महिन्यांमध्ये पूर्ण करावी. - राजेंद्र पवार, मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :PuneपुणेGanpati Festivalगणेशोत्सवmahavitaranमहावितरणelectricityवीजMONEYपैसा