नातेवाईक विवाहितेचा विनयभंग, कानाचा चावा घेऊन पाडला तुकडा; पुण्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 12:28 IST2018-01-08T11:35:40+5:302018-01-08T12:28:16+5:30
नात्यातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून कानाचा चावा घेऊन जखमी केल्या प्रकरणी एकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत चावल्याने पीडित....

नातेवाईक विवाहितेचा विनयभंग, कानाचा चावा घेऊन पाडला तुकडा; पुण्यातील घटना
चाकण : नात्यातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून कानाचा चावा घेऊन जखमी केल्या प्रकरणी एकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत चावल्याने पीडित महिलेचा कानाचा तुकडा पडला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अर्चना दयाळ यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शनिवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास दावडमळा येथे फिर्यादीच्या राहत्या घरी घडला. याप्रकरणी आरोपी मच्छिन्द्र पोपट कोहिनकर ( रा. कोहिनकरवाडी, ता.खेड, जि.पुणे ) वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित विवाहिता हि शनिवारी आपल्या घरात बेडवर फोनवर बोलत असताना आरोपी तिथे आला व फिर्यादीस म्हणाला, तू कुणाशी बोलते? तेंव्हा मी बहिणीशी बोलत आहे.
असे म्हटल्यावर आरोपीने फिर्यादीस मिठी मारून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. पीडित महिलेने प्रतिकार केला असता फिर्यादीचा गळा दाबून खाली पाडले व दाताने उजव्या कानाचा चावा घेऊन कानाचा तुकडा तोडला. फिर्यादी महिलेने आरडा ओरडा केल्याने शेजारील बायका आल्याने आरोपी पळून गेला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्चना दयाळ ह्या पुढील तपास करीत आहेत.