लग्न करण्यास नकार; तरुणीचे व्हिडिओ व्हायरल

By भाग्यश्री गिलडा | Updated: April 5, 2024 13:48 IST2024-04-05T13:47:48+5:302024-04-05T13:48:28+5:30

ओळखीच्या लोकांना व्हिडीओ व फोटो पाठवून बदनामी केल्याची धक्कादायक माहिती समोर

refusal to marry Young girl video goes viral | लग्न करण्यास नकार; तरुणीचे व्हिडिओ व्हायरल

लग्न करण्यास नकार; तरुणीचे व्हिडिओ व्हायरल

पुणे : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेने लग्नास नकार देऊन संपर्क करणे बंद केल्याने तिचे खासगी व्हिडीओ व फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल किलयुगाचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (दि. ४) बापू तूलशीराम आव्हाड (वय-३३ रा. चंदननगर) याच्यावर फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत २३ वर्षीय महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.३) सकाळी दहा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडला आहे. पीडित महिला तिच्या पतीपासून विभक्त राहत असून त्यांची कौटुंबिक न्यायालयात केस सुरु आहे. पीडित महिला आणि आरोपी यांची कामाच्या ठिकाणी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. मात्र, महिलेचा घटस्फोट अद्याप झाला नसल्याने तिने आरोपीकडे लग्नासाठी सहा महिन्यांचा वेळ मागितला. मात्र आरोपीने याला नकार देऊन तत्काळ लग्न करण्यासाठी तगादा लावला. तसेच लग्न केले नाहीतर मारुन टाकण्याची धमकी दिली.

दरम्यान पीडित महिला तिच्या मुलांना भेटण्यासाठी रत्नागिरी येथे जाणार होती. याबाबत तिने आरोपीला सांगितले असता त्याने मुलांना भेटू देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने महिलेने त्याच्यासोबत संपर्क करणे बंद केले. त्यानंतर आरोपीने वारंवार फोन व मेसेज करुन त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपीने त्याच्या मित्राच्या मोबाईल नंबरवरुन महिलेचा मित्र व तिच्या पतीला खासगीत काढलेले फोटो व व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून पाठवले. तसेच ओळखीच्या लोकांना व्हिडीओ व फोटो पाठवून बदनामी केल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भस्मे करत आहेत.

Web Title: refusal to marry Young girl video goes viral