लोकमत इम्पॅक्ट: शिल्लक कोव्हॅक्सिनचे डोस वापरायला अखेर परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 19:37 IST2021-04-10T19:35:40+5:302021-04-10T19:37:18+5:30
राज्य सरकारने काढले होते डोस राखीव ठेवण्याचे आदेश

लोकमत इम्पॅक्ट: शिल्लक कोव्हॅक्सिनचे डोस वापरायला अखेर परवानगी
लोकमत इम्पॅक्ट : शिल्लक असलेले कोव्हॅक्सिनचे डोस पहिल्या टप्प्यातील लसीकरणाला वापरायला राज्य सरकारने अखेर परवानगी दिली आहे. शिल्लक असलेले ६७००० डोस यामध्ये वापरता येणार असल्याने पुण्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लसीकरण थांबवण्याची वेळ आली. राज्यातही अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला होता.मात्र या गोंधळीचे वेगळेच कारण समोर आले होते. राज्याकडे कोव्हिडशिल्डचा तुटवडा असला तरी प्रत्यक्षात कोव्हॅक्सिन उपलब्ध होते. मात्र राज्य सरकारने या लसी दुसऱ्या डोस साठी राखीव ठेवायचा आदेश दिला होता. राज्य सरकारने ५ तारखेला काढलेल्या आदेशानुसार या संपुर्ण लसी दुसऱ्या डोस साठी राखीव ठेवण्यास सांगण्यास आले होत्ते. या लसी शिल्लक असल्याने केंद्र सरकार नव्या लसी कशासाठी द्यायचा असा सवाल उपस्थित केला होता. लोकमत ने काल हा गोंधळ उजेडात आणला होता.
आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर सर्व लसी वापरायला परवानगी देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले “ आम्हांला कोव्हॅक्सिन पहिल्या डोसला वापरायला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता काहीसा दिलासा मिळणार आहे”.
--