शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खडकवासला धरण प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडलेले आवर्तन १५ डिसेंबरपर्यंत सुरू राहणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 13:13 IST

इंदापूर,दौंड व बारामती भागातील शेतीसाठी कालव्याद्वारे सोडण्यात आलेले आवर्तन येत्या १५ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.

ठळक मुद्देपावसाने पाठ फिरविल्याने काही भागातील शेतक-यांना रब्बीच्या पेरण्याही नाहीकालवा दूर्घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीला पाणी सोडण्यास उशीर २८ नोव्हेंबर २०१८ रोजी धरण प्रकल्पात केवळ २०.८४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध

पुणे: इंदापूर,दौंड व बारामती भागातील शेतीसाठी खडकवासला धरण प्रकल्पातून कालव्याद्वारे सोडण्यात आलेल्या रब्बीच्या आवर्तनास एक महिना पूर्ण झाला आहे. सध्या दौंड-भिगवन परिसरातील शेतीसाठी पाणी दिले जात असून लवकरच पाटस व यवत भागातील शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. त्यामुळे कालव्याद्वारे सोडण्यात आलेले रब्बीचे आवर्तन येत्या १५ डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे.दांडेकर पुलाजवळ झालेल्या कालवा दुर्घटनेमुळे दौंड, इंदापूर व बारामतीसाठी सोडण्यात आलेले पाणी महिनाभरापासून बंद ठेवावे लागले होते.पावसाने पाठ फिरविल्याने काही भागातील शेतक-यांना रब्बीच्या पेरण्याही करता आल्या नाहीत.मात्र,काही भागात पावसाच्या हलक्या सरीनंतर जमिनीत निर्माण झालेल्या ओलाव्यावर काही शेतक-यांनी पेरण्यात केल्या होत्या.त्यामुळे ही पिके थोडी तग धरून होती.मात्र,कालवा दूर्घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतीला पाणी सोडण्यास उशीर झाला.त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले.परंतु,जलसंपदा विभाग व महापालिका प्रशासनाने कालवा दुरूस्तीचे काम पूर्ण केल्यानंतर २७ आॅक्टोबर रोजी कालव्यातून पाणी सोडण्यात आले.कालव्याद्वारे खडकवासला धरणातून सध्या १२५२ क्यूसेकने पाणी सोडण्यात आले आहे.पाणी सोडून एक महिना पूर्ण झाला आहे.परंतु,ग्रामीण भागातील सर्व क्षेत्राला पाण्याचे वितरण न झाल्याने येत्या १५ डिसेंबरपर्यंत कालवा सुरू ठेवला जाणार आहे.राज्यात दुष्काळी परिस्थिती असून पुणे जिल्ह्यातील धरणातही कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करून शहरी व ग्रामीण भागाला पाणी पुरवठा करावा लागणार आहे. गेल्या वर्षी २८ नोव्हेंबर २०१७ रोजी खडकवासला धरण प्रकल्पात २५.४७ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध होता.परंतु,२८ नोव्हेंबर २०१८ रोजी धरण प्रकल्पात केवळ २०.८४ टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे.मागील वषार्पेक्षा यंदा धरण प्रकल्पात ४.६३ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.खडकवासला धरणातून शेतीसाठी उन्हाळी आवर्तन सोडावे लागणार आहे.मात्र,पालिका प्रशासनाकडून १३५० एमएलडी पाणी उचलले जात असल्याने उन्हाळी आवर्तण सोडण्यास अडचण येणार आहे.त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पुणेकरांना पिण्यासाठी आणि ग्रामीण भागात शेतीसाठी पाणी कसे देता येईल,याबाबत जलसंपदा विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :PuneपुणेDamधरणFarmerशेतकरीagricultureशेती