शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
4
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
5
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
6
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
7
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
8
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
9
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
10
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
11
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
12
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
13
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
14
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
15
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
16
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
17
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
18
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
19
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
20
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?

पुण्यात बहुतांश ठिकाणी बंडखोरी; २१ पैकी ८ मतदारसंघांत खरी लढत पवार विरुद्ध पवारच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:22 IST

बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल

पुणे : जिल्ह्यातील २१ मतदारसंघांतील लढती सोमवारी दुपारी ३ नंतर निश्चित झाल्या. यातील बारामती विधानसभा मतदारसंघ जिल्ह्यात हाय व्होल्टेज ठरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यात ही लढत होत आहे. अन्य मतदारसंघांपैकी बहुतांश ठिकाणी बंडखोरी झाली आहे. महायुती व महाविकास आघाडी यांच्यात मुख्य लढत असली, तरीही बहुतेक बारामती, वडगाव शेरी, हडपसर, आंबेगाव, जुन्नर, पिंपरी, इंदापूर, शिरूर अशा काही मतदारसंघांत खरी लढत ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार, अशीच होणार असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि भाजप उमेदवार यांच्यामध्ये काट्याची टक्कर होईल, असे चित्र आहे.

बारामतीमधील लढत ही केवळ जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल, अशी चर्चा प्रत्यक्ष प्रचार किंवा निवडणुकीपूर्वीच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार इथे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आहेत, तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार लढत देत आहेत. त्यामुळेच या मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. ही खरी लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच असल्याचे बोलले जात आहे. जाहीर सभा, प्रचारफेऱ्या, वैयक्तिक गाठीभेटी यांचा धुरळाच या मतदारसंघात प्रचाराच्या १४ दिवसांत उडेल, असे बोलले जात आहे.

बंडखोर उमेदवार ठरतील निर्णायक

दिवाळीनंतर सोमवारी जिल्ह्यातील राजकीय हालचालींनी एकदम गती घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची मुदत असल्याने सर्वच नेते बंडखोर उमेदवारांची मनधरणी करण्यात गुंतले होते. त्यातील काहींनी नेत्यांच्या म्हणण्याला मान देत, काहींनी स्वत:च्या मागण्यांवर आश्वासन घेत उमेदवारी अर्ज मागे घेतले, तरीही काही ठिकाणी बंडखोरी कायम राहिली. जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांत बंडखोरी झाली आहे. त्यात प्रामुख्याने पुणे शहरात कसबा, शिवाजीनगर, पर्वती, तर जिल्ह्यात जुन्नर, इंदापूर, पुरंदर, भोर या मतदारसंघांचा समावेश आहे. या ठिकाणच्या लढतींमध्ये बंडखोर उमेदवार निवडणुकीच्या निकालात निर्णायक ठरतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

हाय व्होल्टेज मतदारसंघ

बारामती

उमेदवारअजित पवार - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

युगेंद्र पवार- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)संदीप चोपडे- (रासप)

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थेट लढत असलेले मतदार संघ

वडगाव शेरी

सुनील टिंगरे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)बापू पठारे- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

हडपसर 

चेतन तुपे - राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)प्रशांत जगताप - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) 

जुन्नर

 अतुल बेनके ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)  सत्यशील शेरकर ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) शरद साेनवणे  (अपक्ष) आशाताई बुचके (अपक्ष ) देवराम लांडे (वंचित आघाडी)

आंबेगाव 

 दिलीप वळसे-पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)  देवदत्त निकम ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) सुरेखा निघोट (उबाठा-अपक्ष)  सुनील इंदोरे (अपक्ष)

 शिरुर 

१. ज्ञानेश्वर कटके ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) २. अशोक पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)

इंदापूर 

 दत्तात्रय भरणे ( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार)  हर्षवर्धन पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) प्रवीण माने (अपक्ष) तानाजी शिंगाडे (अपक्ष)

 पिंपरी  अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी अजित पवार)  विरुद्ध सुलक्षणा शिलवंत (राष्ट्रवादी शरद पवार)

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस