शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​'मेट्रो'च्या स्थानकांचा पादचाऱ्यांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 13:14 IST

प्रत्येक १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्थानकांमधून पादचाऱ्यांना रस्ता विनासायास ओलांडता येईल...

ठळक मुद्देरस्ता ओलांडता येणार: मेट्रो चा वापर करण्याची सक्ती नाहीमेट्रोच्या काही स्थानकांमध्ये दुसऱ्या मजल्यावर व्यावसायिक दुकानेहीएसएनडीटी महाविद्यालयासमोरचा बराच जुना असलेला स्काय वॉकही पाडण्यात येणार

पुणे : भरधाव जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना येणारी अडचण आता किमान मेट्रो मार्गावर तरी दूर होणार आहे. प्रत्येक १ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्थानकांमधून पादचाऱ्यांना रस्ता विनासायास ओलांडता येईल. त्यासाठी त्यांनी मेट्रोचा वापर केलाच पाहिजे असे बंधन नाही. वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट असे दोन मेट्रो मार्ग आहे. यातील पौंड रस्ता, कर्वे रस्ता, महापालिका मार्ग व पुढे येरवडा वगैरे ठिकाणी रस्ता ओलांडणे हे पादचाऱ्यांसाठी दिव्य ठरले आहे. पालिकेने काही ठिकाणी स्काय वॉक म्हणजे रस्त्याच्या वर पादचारी उड्डाणपूल बांधून नागरिकांची सोय केली आहे. मात्र त्यासाठी या पुलांवर चढणे, उतरण्याचे दिव्य करावे लागते. त्यामुळे बरेचजण जीव मुठीत धरून कसातरी रस्ता ओलांडत असतात.अशा सर्वांना किमान मेट्रो मार्गावर तरी आता दिलासा मिळेल. दर एक किलोमीटर अंतरावर मेट्रोचे स्थानक आहे. या स्थानकामध्ये चढण्याउतरण्यासाठी नेहमीचा जीना, सरकता जीना तसेच लिफ्ट अशा तीन सुविधा करण्यात येणार आहेत. त्यांचा मुक्त वापर नागरिकांना करता येणार आहे. रस्ता ओलांडण्यासाठी म्हणूनच ही सुविधा विनामुल्य ठेवण्यात आली आहे. मेट्रो वापरत असाल तरच स्थानकात यायचे, अन्यथा नाही असे कसलेही बंधन महामेट्रोने ठेवलेले नाही. प्रत्येक स्थानक दोन मजली आहे. एकदम वरच्या मजल्यावर फलाट असून तिथून थेट मेट्रोत जाता येईल. त्याखालचा मजला मात्र सर्वांसाठी खुला असणार आहे. वृद्धांसह कोणीही नागरिक रस्ता ओलांडण्यासाठी म्हणून मेट्रो स्थानकातील या सुविधेचा वापर करू शकतो. त्यामुळेच आता एसएनडीटी महाविद्यालयासमोरचा बराच जुना असलेला स्काय वॉकही पाडण्यात येणार आहे असे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.------------मेट्रोच्या काही स्थानकांमध्ये दुसऱ्या मजल्यावर व्यावसायिक दुकानेही असतील. त्याचाही नागरिकांना तसेच दुकानदारांनाही फायदा होणार आहे. फक्त रस्ता ओलांडण्यासाठी म्हणून स्थानकात आलेल्या नागरिकांना स्थानकाच्या दुसºया मजल्यावर, म्हणजे मेट्रो सुरू होते त्या मजल्यावर मात्र जाता येणार नाही. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो