शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

चाचणीसाठी ‘गायडेड पिनाका’ सज्ज : डॉ. के. एम. राजन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 7:04 PM

भारताला शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीबरोबर आधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती एआरडीए तर्फे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देपुढील महिन्यात होणार पोखरणला चाचणी : लक्ष्याचा पाठलाग करण्याची रॉकेटमध्ये क्षमताअत्याधुनिक बदल करत मार्क १ आणि मार्क २ या नव्या पिनाका प्रणालीची निर्मिती

पुणे : कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या भारतीय बनावटीची ‘पिनाका मल्टिबॅरल रॉकेट सिस्टीम’ जवळपास ८० किलोमीटरपर्यंत लक्ष्याचा पाठलाग करून त्याचा वेध घेण्यास सक्षम होणार आहे. पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट तर्फे (एआरडीए) गायडेड पिनाकाचे नवे डिझाईन तयार करण्यात आले आहे. याची पहिली चाचणी यशस्वी झाली असून, लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता असणारी चाचणी महिन्यात पोखरण येथे करण्यात येणार असल्याची माहिती एआरडीएचे संचालक डॉ. के. एम. राजन यांनी शुक्रवारी ( दि.२४आॅगस्ट)  पत्रकार परिषदेत दिली.      डीआरडीओची प्रमुख प्रयोगशाळा असलेली पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटला १ सप्टेंबरला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. राजन म्हणाले, ‘‘भारताला शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पारंपरिक शस्त्रास्त्रांच्या तंत्रज्ञानाच्या निर्मितीबरोबर आधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती एआरडीए तर्फे करण्यात आली आहे. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्ससाठी अनेक शस्त्रास्त्रे आतापर्यंत बनविण्यात आली आहेत. यात अनेक बॉम्ब, भूसुरंग आणि पाणतीराबरोबर वैमानिकांना बाहेर पडण्यासाठी एअर इजेक्टिंग सिस्टीम बनविण्यात आली आहे. एकाच वेळी १२ रॉकेट डागण्याची क्षमता असलेल्या पिनाका मल्टी बॅरल रॉकेटची निर्मिती एआरडीए तर्फे करण्यात आली होती. यात अत्याधुनिक बदल करत मार्क १ आणि मार्क २ या नव्या पिनाका प्रणालीची निर्मिती करण्यात आली होती. कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याच्या बंकरचा अचूक वेध पिनाकाने घेतला होता. फक्त ४४ सेकंदांत १२ रॉकेट डागण्याची या शस्त्रात क्षमता आहे. या शस्त्राची मारकक्षमता ६० किमी एवढी आहे. मात्र, लष्कराच्या मागणीनुसार यात बदल करण्यात आले असून, त्यांची मारकक्षमता ८० किलोमीटरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच लक्ष्याचा पाठलाग करण्याची क्षमता एआरडीएच्या शास्त्रज्ञांनी पिनाकामध्ये विकसित केली आहे. याच्या काही चाचण्या आधी झाल्या असून, त्या यशस्वी झाल्या आहेत.  पुढील महिन्यात लक्ष्याचा अचून वेध घेण्याची क्षमता किती आहे, याबाबतची चाचणी पोखरण येथे करण्यात येणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली आहे, असे राजन म्हणाले. या नंतर लक्ष्याचा पाठलाग करण्याची क्षमता याबाबतची चाचणी बालासोर येथे करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व चाचण्या झाल्यानंतर हे शस्त्र भारतीय लष्कराला सुपूर्द करण्यात येणार आहे. 

एआरडीएला ६० वर्षे पूर्ण डीआरडीओची प्रमुख प्रयोगशाळा असलेली पुण्यातील आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटला  १ सप्टेंबरला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या काळात शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रिव्हर्स इंजिनिअरिंग बरोबरच देशी तंत्रज्ञानाचा विकासही करण्यात आला आहे. आॅर्डनन्स फॅक्ट्रीच्या साह्याने या शस्त्रास्त्रांचे उत्पादन देशात सुरू आहे. ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवे प्रकल्प हातात घेण्यात येतील असेही डॉ. के. एम. राजन म्हणले.२० लाख रायफल्सची निर्मितीलष्करातील जवानांना अत्याधुनिक शस्त्र मिळावीत या दृष्टिकोनातून ‘इन्सास’ (इंडियन स्मॉल आर्म्स सिस्टीम) रायफल्सची निर्मिती एआरडीईने केली आहे. या रायफल्सचे डिझाईन आणि चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने, त्या अनुषंगाने सैनिकांसोबतच सशस्त्र दल आणि सीमा सुरक्षा दल, पोलीस यांना त्याचा पुरवठा केला जात आहे. आजमितीला २० लाख रायफल्स, ६०० कोटींची विस्फोटके आणि एक लाख लाईट मशीन गन उत्पादित करून सुरक्षा दलांना पुरविण्यात आली आहेत. एआरडीईचे शास्त्रज्ञ ९ एमएम कार्बोइनच्या जागी मॉडर्न सबमशीन कार्बोइन ५.५६  एमएम कार्बोइन विकसित करत आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची निर्मिती करण्यात येत आहे. त्याकरिता डीआरडीओ आणि एआरडीए यांच्या संयुक्त मदतीने पुढील दोन वर्षांत याचा प्रत्यक्ष वापर सुरू होईल.  

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानwarयुद्ध