शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

धायरीतील समस्यांना आज फुटणार वाचा

By admin | Updated: January 14, 2015 03:25 IST

प्रभागातील कचरा, आरोग्य, वाहतूक, पाणी व ड्रेनेज आदी समस्यांवर या वेळी चर्चा होणार आहे.

पुणे : सिंहगड रस्ता, धायरी फाटा व गावठाण येथील प्रभाग क्रमांक ५४ मधील विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन बुधवारी (दि. १४) गणेशनगर येथील मुक्ताई गार्डनमध्ये सायंकाळी ४ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे. प्रभागातील कचरा, आरोग्य, वाहतूक, पाणी व ड्रेनेज आदी समस्यांवर या वेळी चर्चा होणार आहे. शहरातील कचरा, नदी सुधारणा, टेकड्यांचा ऱ्हास, आरोग्याची हेळसांड या प्रमुख समस्यांविषयी ‘लोकमत’ने ‘आता बास’ ही मोहीम राबविली. त्यापुढचे पाऊल म्हणून ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. महापालिकेच्या हद्दीत समावेश झाल्यानंतर प्रामुख्याने सिंहगड रस्त्याच्या परिसराचा विकास झाला. त्यामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्या तुलनेत मूलभूत सोयी-सुविधा निर्माण झाल्या नाहीत. त्यामुळे प्रामुख्याने सिंहगड रस्त्यावरील वाहतूककोंडी ही प्रमुख समस्या असून, उड्डाणपुलाचे काम झाल्यानंतरही वाहतुकीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. प्रभाग क्रमांक ५४ मध्ये धायरी गावठाणचा परिसर येतो. महापालिकेत या भागाचा समावेश झाल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प व सोसायट्या उभ्या राहिल्या. मात्र, परिसरात उद्यान, मैदान, सुसज्ज दवाखाना, आधुनिक सुविधा असलेली भाजी मंडई आदी सार्वजनिक सुविधा निर्माण झाली नाही. या भागात महापालिकेचा एकही महत्त्वाचा प्रकल्प उभारण्यात आलेला नाही. मात्र, कचरा, सांडपाणी, पाणीपुरवठा, रस्त्याची दुरवस्था व अनधिकृत बांधकामे आदी समस्यांना नागरिकांना समोरे जावे लागत आहे. या प्रभागातील विविध प्रश्नांना वाचा फोडून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी स्थानिक नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, नगरसेविका युगंधरा चाकणकर, सहायक आयुक्त जयंत भोसेकर आदी उपस्थित राहणार आहेत. तरी प्रभागातील नागरिकांना उपस्थित राहून लेखी स्वरूपातही समस्या मांडण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)