शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक हत्याकांडातील सात पैकी तिघांचे पुन्हा शवविच्छेदन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2023 18:53 IST

दफन केलेली मृतांची शरीरे परत काढली बाहेर

यवत : यवत पोलीस स्टेशन हद्दीतील पारगाव (ता. दौंड) येथे भीमा नदीच्या पात्रात सापडलेले सात पैकी तीन मृतदेहांचे आज परत शवविच्छेदन करण्यात आले. सात जणांच्या सामूहिक हत्याकांडामुळे पोलीस यंत्रणा यातील सर्व बाबी बारकाईने तपासत आहे. मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चुलत भावांनी सात जणांची हत्या केली असल्याची प्रार्थमिक माहिती पोलीस तपासात समोर आली होती.

संपूर्ण कुटुंबच या हत्याकांडात मरण पावल्याने तसेच नातेवाईक गरीब असल्याने पोलिसांनी नातेवाईकांचे उपस्थितीत यवत येथे अंत्यविधी करत मृतांची शरीर दफन केली होती. मंगळवार दि 24 रोजी चार तर बुधवार दि. 25 रोजी तीन मृतांची शरीरे नवीन मुठा कालव्यालगत दफन करण्यात आली होती.मृत्यू  झालेल्या सात पैकी तिघांचे शवविच्छेदन यवत येथील ग्रामीण रुग्णालयात तर चौघांचे शवविच्छेदन पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले होते. यवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केलेल्या तिघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचा अहवाल तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना दिला आहे. आज पोलिसांनी दफन केलेल्या तीन व्यक्तींची शरीर बाहेर काढून तेथेच पुण्यातील ससून रुग्णालयातील वैद्यकीय टीम, दौंडचे तहसीलदार संजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या उपस्थितीत परत शवविच्छेदन करण्यात आले.

पाण्यातून सापडलेली मृत शरीरे कुजलेल्या अवस्थेत होती. यामुळे त्यांचा व्हिसेरा ठेवता आलेला नाही. यामुळे नेमका सात जणांचा खून केला तरी कसा? जर जिवंत असताना यांना पाण्यात टाकले तर त्यांना पोहता येत नव्हते का? आणि नेमकी घटना घडली तरी कशी? असे एक ना अनेक प्रश्न यामुळे निर्माण होत असून पोलीस तपासात कोणत्या बाबी समोर येतात हेही महत्त्वाचे आहे.

 दैनिक लोकमत मधून मृतांच्या शवविच्छेदन अहवाल बाबत यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांची प्रतिक्रिया छापण्यात आली. सदर प्रतिक्रियेत तिघांचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचा अहवाल पोलिसांना देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक यांनी दिली होती. यामुळे सामूहिक हत्याकांड प्रकरणातील गूढ आणखीच वाढले आहे.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटकriverनदी