कोरोनाच्या संकटात 'बीव्हीजी'कडून आशेचा किरण; उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी ‘शतप्लस'चे उत्पादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2021 05:59 PM2021-04-16T17:59:59+5:302021-04-16T18:00:27+5:30

सध्याच्या काळात कोरोना संसर्गाला नियंत्रित करू शकणारे असे हे औषध निरोगी शरीरासाठी आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण असल्याचा दावा...

A ray of hope from BVG in the Corona crisis; Production of ‘Shatplus’ for better immunity | कोरोनाच्या संकटात 'बीव्हीजी'कडून आशेचा किरण; उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी ‘शतप्लस'चे उत्पादन 

कोरोनाच्या संकटात 'बीव्हीजी'कडून आशेचा किरण; उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी ‘शतप्लस'चे उत्पादन 

Next

पुणे:- शरीराला कोणत्याही आजाराचा विळखा चटकन बसतो. कारण मनुष्याच्या शरीरात आजाराशी लढा देणाऱ्या रोगप्रतिकारक शक्तींचा अभाव असतो. अनेक वर्षांच्या संशोधनातून बीव्हीजी लाइफ सायन्सेस लिमिटेड (बीव्हीजी) या कंपनी ने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि विविध व्हायरल व विषाणूजन्य संसर्गाशी लढा देण्यासाठी आर अँड डी वर आधारित ’शतप्लस’ हे आयुर्वेदिक औषध निर्मित केले आहे. सध्याच्या काळात कोरोना संसर्गाला नियंत्रित करू शकणारे असे हे औषध निरोगी शरीरासाठी आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्तीसाठी आशेचा किरण असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर रोगप्रतिकारक शक्ती संतुलित करणाऱ्या या आयुर्वेदिक औषधाची माहिती बीव्हीजी चे संस्थापक आणि संचालक हणमंतराव गायकवाड यांनी शुक्रवारी (दि.16) पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नायडू रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर पाटसुटे, बीव्हीजी ग्रुपच्या बीव्हीजी लाईफ सायन्स लिमिटेडचे उपाध्यक्ष डॉ. पवन के. सिंघ आणि वैद्य हरिश पाटणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गायकवाड म्हणाले, सध्या संपूर्ण जग हे भीतीदायक वातावरणातून जात आहे. अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अशा काळात शतप्लस हे औषध लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरणारे आहे. हे औषध वापरण्यास पूर्णपणे सुरक्षित असून, त्यात अँटी ऑक्सिडेटीव्ह, अँटी इंप्लेमेटरी, अँटी व्हायरल आणि इम्युनो मॉड्युलेटरी हे गुणधर्म आहेत. आयुर्वेद आणि नँनो टेक्नोलॉजीवर आधारित शतप्लस चिकित्सेमुळे प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये सार्स कोविड विषाणूच्या संख्येत 94 टक्के घट दिसून आली आहे.

याशिवाय डॉ. नायडू संसर्गजन्य रूग्णालयात करोनाबाधित रूग्णांवर सीआरटीआय च्या मार्गदर्शक तत्वांनुसार केल्या गेलेल्या चाचण्यांच्या अंती सकारात्मक परिणाम समोर आले असून, शतप्लस एक सहाय्यक उपचार पद्धती म्हणून पुढे आले आहे. उपचारांच्या पहिल्या 4 दिवसातच 73 टक्के, सातव्या दिवशी 96.7 टक्के, तर उपचाराच्या दहाव्या दिवशी शंभर टक्के शतप्लस उपचार गटातील रूग्णांना फायदा झालेला दिसून आला आहे. जम्बो सेंटर आणि नायडू रुग्णालयाला हे औषध दिले जाईल, असे महापालिकेतर्फे सांगण्यात आले आहे. आयुष मंत्रालायला देखील या औषधाच्या संशोधनाचा सर्व रिपोर्ट दिला. त्यानंतर औषधाची पडताळणी करण्यासाठी दहा जणांची कमिटी स्थापन करण्यात आली. या समितीमधील सर्व सदस्यांच्या शंका आणि प्रश्नांचे प्रश्नचे निरसन देखील करण्यात आले आहे.

डॉ.सुधीर पाटसुटे यांनी ‘शतप्लस’ औषधाच्या सकारात्मक परिणामांविषयी समाधान व्यक्त केले . कोविडच्या उपचारांमध्ये अनेक घटक महत्वपूर्ण भूमिका बजावतात. कोणत्याच अमूक एका औषधाने कोविडवर मात करता येते असे म्हणता येत नाही. मात्र, अशा परिस्थितीत ’शतप्लस’ हे औषध रोग प्रतिकारक शक्ती वाढवून रूग्णाच्या उपचारांमध्ये सहाय्यक म्हणून महत्वाची भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले.

डॉ. पवन के. सिंघ म्हणाले, शतप्लसच्या उपचाराने खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा धाप लागणे याही व्याधी-लक्षणे नियंत्रणात आल्याचे निदर्शनास आले आहे. या औषधामुळे रोग प्रतिकारक शक्ती सूचकांवर अर्थात इम्युनिटी इंडीकेटर्सवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. शतप्लस हे वैद्यकीय दृष्ट्या वैध आयुर्वेदिक औषध असून, विषाणूजन्य संक्रमणापासून ते संरक्षण करते आणि लढायला मदत करते. मात्र हे औषध केवळ कोव्हिडसाठी बनविण्यात आलेले नाही.

वैद्य हरीश पाटणकर यांनी देखील संशोधनातून विकसित झालेले हे उत्तम औषध आहे. कोविड सुरू झाल्यापासून 2000 लोकांना हे औषध दिले असून, त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले असल्याचे सांगितले.

---------------------------------------------------

’शतप्लस’औषधाचे फायदे

* खोकला, श्वास घेण्यास अडचण किंवा धाप लागणे यावर नियंत्रण ठेवणे शक्य होते.

* कोरोना रूग्णांनी औषध घेतल्यास आजार बळावत नाही.

* व्हेंटिलेटरची आवश्यकता लागत नाही.

* पोट साफ होण्यास मदत होते.

* रोगप्रतिकारशक्ती वाढीस मदत करते.

* रूग्णालयाची लाखो रूपयांची बिले देण्यापेक्षा 1000 रूपयांमध्ये उपलब्ध, औषध फायदेशीर ठरणारे आहे.

--------------------------------------------------------------------------------------------

’’माझ्या आईचे वय 55 वर्षे आहे. तिला मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तिला कोरोना झाल्याचे निदान झाल्यानंतर ससूनमध्ये उपचारासाठी दाखल केले. रक्तातील साखर अतिप्रमाणात वाढल्याने डॉक्टरांनी स्थिती गंभीर होऊ शकते सांगितले. यादरम्यान तिला शतप्लस हे औषध दिले. ते घेतल्यानंतर आईची तब्येत सुधारली. हे औषध अत्यन्त गुणकारी आहे- रविकांत वरपे

--------------------------------------

मला 40 वर्षांपासून उष्णतेचा त्रास होता. सतत अंग गरम राहायचे. पण हे औषध घेतल्यावर शरीरातील आग, जळजळ कमी झाली. पोट साफ होण्यास मदत झाली. हे औषध घेतल्यानंतर मला कोरोना होणारच नाही असा आत्मविश्वास आलायं. हे औषध मनातली भीती घालवते. हे औषध बाजारात सहज उपलब्ध व्हावे- अलका जोशी

Web Title: A ray of hope from BVG in the Corona crisis; Production of ‘Shatplus’ for better immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app