शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

रविराज तावरे गोळीबार प्रकरण; राष्ट्रवादीच्या माजी सरपंचाच्या समर्थनार्थ माळेगावकर रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:54 IST

गाव बंद ठेवत केला अटकेचा निषेध, गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

ठळक मुद्देजयदीप तावरे यांचे सर्व कुटुंब महिलांसह उपस्थित होते.यावेळी सर्व कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू पहावयास मिळाले.

माळेगाव: राष्ट्रवादीचे माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांच्या अटकेच्या विरोधात माळेगांव येथे जनता रस्त्यावर उतरली आहे. या वेळी जयदिप तावरे यांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी माळेगांव येथे पुकारण्यात आलेल्या बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान गावात अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

गोळीबार प्रकरणी रविराज तावरे यांनी दिलेल्या जबाबावरुन माजी सरपंच जयदीप दिलिप तावरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या अटकेच्या विरोधात जयदिप तावरे समर्थकांनी माळेगाव बंदसह निषेध सभा आयोजित केली होती. व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला उत्फुर्द प्रतिसाद दिला.

शिवाजी चौकात निषेध सभा झाली. ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी संतोष जगताप, दादा जराड, राजेंद्र तावरे, दिलीप तावरे, आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच जयदीप तावरे यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला. यावेळी पणदरे, धुमाळवाडी, निरावागज येथील युवक सहभागी झाले होते. समर्थकांनी पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना निवेदन दिले. दरम्यान या निषेध सभेत हजारो युवक उपस्थित होते.या सभेत जयदीप तावरे यांचे सर्व कुटुंब महिलांसह उपस्थित होते.यावेळी सर्व कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू पहावयास मिळाले.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिसArrestअटक