शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2024 13:08 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपाचेमुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यात लढत होत आहे. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात असलेल्या या अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच मतदानाची तारीख जवळ येत असतानाच रवींद्र धंगेकर यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. पुण्यामध्ये पैशांचे ट्रक आले आहेत, तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्याचं वाटप होणार आहे, असा दावा धंगेकर यांनी केला आहे.

भाजपावर गंभीर आरोप करताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, मतदानाला दोन दिवस राहिले असताना, भाजपाचे कार्यकर्ते, पोलीस, गुन्हेगार यांची दादागिरी सुरू झाली आहे. पुण्यामध्ये पैशांचे ट्रक येऊन थांबले आहेत. या ट्रकमधील पैशांचं देवेंद्र फडणवीस आज वितरण करतील. या निवडणुकीसाठी भाजपानं प्रचंड पैसा आणला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याकडे करोडो रुपये आहेत. तसेच ते वाटायला आता सुरुवात करतील. पोलीस खातं, निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करणार, असा आरोप धंगेकर यांनी केला. निवडणूक आयोग देशाचं ऐकत नाही तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं काय ऐकणार, असेही रवींद्र धंगेकर म्हणाले.

दरम्यान, भाजपा उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी  रवींद्र धंगेकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. रवींद्र धंगेकर यांना स्टंटबाजी करायची सवय झाली आहे. कुठलं तरी स्टेटमेंट करायचं मोठ्या नेत्यांवर बोलायचं. मात्र पुणे कर सुज्ञ आहेत. त्यांना सगळं समजतं. एक दोनदा केलेलं पचून जातं. मात्र वारंवार असं केलं तर लोक त्यावर विश्वास ठेवत नाहीत, असा टोला मोहोळ यांनी लगावला. 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४pune-pcपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरcongressकाँग्रेसBJPभाजपाmurlidhar moholमुरलीधर मोहोळlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४