शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:58 IST

सुरुवातीला आमदारकी, पुन्हा खासदारकी, आता परत मागच्या वर्षी आमदारकी एवढी संधी पक्षाने कधीच कोणाला दिली नव्हती

पुणे : कसबा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल उपमुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसबाबत कोणतीही नाराजी नाही असे सांगत धंगेकरांनी धनुष्यबाण हाती घेतला. आता या राजकीय घडामोडीनंतर पुण्यात काँग्रेस नेत्यांच्या नाराजीच्या प्रक्रिया समोर आल्या आहेत. माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे. म्हणून ते महायुतीत गेल्याची टीका शिंदे यांनी केली आहे.   

शिंदे म्हणाले, धंगेकर यांना आमदार होण्याची संधी दिली. त्यावेळेला पक्षाला किंवा या शहराला तुम्ही पक्षाच्या आमदारकीच्या माध्यमातनं एकही योजना कधीही आणली नाही. म्हणून त्यांच्यावर जर बोलायला गेलो. तर अनेक गोष्टी बोलता येईल. पण खालच्या थराला उठून तुमचं राजकारण त्यांचं जे आहे. ते व्यावसायिक राजकारण आहे. आज त्यांना जे काही त्यांच्याकडं अडीअडचणी येतात. त्यांनी जे दुष्कर्म केलेत. ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज आहे, म्हणून ते गेलेले आहेत. काँग्रेस पक्ष त्यांना पूर्ण सन्मान दिला गेला, मान दिला गेला असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. 

पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही

पोटनिवडणूक आली. ज्यावेळेला आमचा क्लेम होता तरी पक्षांनी धंगेकरांना दिला. आम्ही त्यांचं काम केलं. निवडून आले पक्षांनी त्यांना एक आमदार होण्याची संधी दिली. त्यानंतर खासदारकी दिली आणि आमदारकी परत दिली. म्हणजे दोन ते तीन वर्षांमध्ये चार वेळा संधी दिली जे आत्तापर्यंत कोणालाही दिली नाही.  निष्ठावंत कार्यकर्ते त्या भागातले असतील. मुक्तार शेख, कमलताई व्यवहारे असेल. अनेकांनी पक्षाला सांगितलं की,  त्यांची नीतिमत्ता आणि विचारधारा काँग्रेस पक्षाची जुळत नाही. ह्यांना तुम्ही संधी देऊ नका. पहिले ह्यांची परीक्षा होऊद्या. पण पक्षाने त्यांना संधी दिली. ज्या दिवशी ते आमदार झाले त्याच्यानंतर किंवा २०१७ ला जरी नगरसेवक होऊन काँग्रेस बरोबर राहिले. पक्षाचा झेंडा कधीही त्यांनी खांद्यावर घेतला नाही. हातात घेतला नाही. आमदार असताना जे काही त्यांनी आंदोलनं केली ती व्यक्तिगत केली. त्याचा फॉलो अप पुढं केला नाही. याची सुद्धा तक्रार त्यावेळेला आम्ही प्रदेश काँग्रेसला केली होती. जे आंदोलन ते करत आहेत. ते ससूनच्या पाटीलचं ड्रुग्सचा विषय असो, पबच्या विरोधातला असो या कुठंही ह्याच्यामध्ये पक्षाचं आंदोलन नव्हतं असंहि शिंदे यांनी यावेळी सांगितले.

आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखे होते 

अनेक वेळेला त्यांना बोलावलं गेलं. पण कोणत्याही आंदोलनामध्ये दोन अडीच वर्षामध्ये त्यांनी एकतरी फोटो आहे का? की या आंदोलनामध्ये आम्ही आलो आम्ही आक्रमक भूमिका घेतली. मग ते मेट्रोचे आंदोलन असेल. महानगरपालिकेचं असेल, जिल्हाधिकारी कार्यालयाचं असेल, राहुल गांधींवर ज्या ज्या वेळेला सत्ताधाऱ्यांनी टीका केली त्याही वेळेला कधी आले नाहीत. त्यांच्या पक्षात, ज्यांच्या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेस त्यांनी बॅनर लावले. त्याच्यावर कधी काँग्रेस पक्ष चिन्ह नव्हतं कधी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे फोटो नव्हते. म्हणून आमच्यासाठी ते अगोदरच गेल्यासारखेच होते.

त्यांच्यामुळं पक्षाला फायदाच कधी झाला नाही

रवींद्र धंगेकर यांच्यासाठी महाराष्ट्रातले अनेक नेते नानाभाऊ पटोले, यशोमती ठाकूर, वड्डेटीवार त्यांनी तर घरोघरी जाऊन प्रचार केलेला होता. अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जीव ओतून काम केलं. आज त्यातली अनेक कार्यकर्ते माझ्याकडं बघतात. त्यांची मी मनापासून माफी मागतो. त्यांच्यामुळं पक्षाला फायदाच कधी झाला नाही हीच तर तक्रार आमची आहे असेहि त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

टॅग्स :Puneपुणेravindra dhangekarरविंद्र धंगेकरcongressकाँग्रेसPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुती