Pune: रवींद्र बर्हाटेला मोक्का गुन्ह्यात अटक; खंडणीसह फसवणूक प्रकरणी १७ हून अधिक गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 13:47 IST2022-01-06T13:45:33+5:302022-01-06T13:47:10+5:30
सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो सुमारे दीड वर्ष फरार होता

Pune: रवींद्र बर्हाटेला मोक्का गुन्ह्यात अटक; खंडणीसह फसवणूक प्रकरणी १७ हून अधिक गुन्हे
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्हाटे (ravindra barate) याला आज चतु:श्रृंगी पोलिसांनी मोक्का गुन्ह्यात अटक केली आहे. औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहातून बर्हाटे याला ताब्यात घेण्यात आले असून पुण्यात आणण्यात आले. मोक्का गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता ११ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
रवींद्र बर्हाटे याच्याविरुद्ध पुणे शहरातील वेगवेगळ्या गुन्ह्यात खंडणीसह फसवणूक प्रकरणी १७ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. कोथरुड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर तो सुमारे दीड वर्ष फरार होता. ६ जुलै २०२१ रोजी गुन्हे शाखेने त्याला हडपसर पोलीस ठाण्यातील मोक्का गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली होती.