शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

कोंढवा फसवणुक प्रकरणात रत्नाकर पवार, अशोक अहिरे यांना चार दिवस पोलीस कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 19:17 IST

जादा नफ्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 1 कोटी 64 लाखांची फसवणूक केली.

पुणे : भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करण्याचे व जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी नाशिक येथील भाजपचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक रत्नाकर ज्ञानदेव पवार यांना न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासह अशोक  अहिरे (रा. नाशिक) यांचाही समावेश आहे.या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोहद्दीस फारुख बखला (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात रत्नाकर पवार व इतरांनी बखला यांना वेगवेगळी आश्वासने देऊन कंपनीत भागीदारी देत असल्याचे सांगून त्यांच्याकडून विविध प्रकल्पात गुंतवणुक करण्यासाठी तसेच कामगारांचे पगार व इतर कामांसाठी वेळोवेळी १ कोटी ६४ हजार ३८७ रुपये घेतले. त्यापैकी बखला यांनी पवार आणि अहिरे यांना ६३ लाख रुपये दिले होते. त्यानंतर पवार व त्यांच्या साथीदारांनी त्या प्रकल्पात पैसे न वापरता त्याचा उपयोग स्वत:साठी केला. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नाकर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. परंतु, सर्व ठिकाणी त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.  त्यानंतर कोंढवा पोलिस त्याचा शोध घेत होते.परिमंडळात पाचचे पोलिस उपआयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार, पोलिस कर्मचारी विशाल गवळी, नितीन कांबळे यांच्या पथकाने दोघांना अटक केली. पवार याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? व पुढील तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी केली. न्यायालयाने दोघांची २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली.

टॅग्स :PuneपुणेfraudधोकेबाजीArrestअटकPoliceपोलिसBJPभाजपा