शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नव्या वर्षात राज्यातील रेशन दुकाने राहणार बंद, विविध मागण्यांसाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 11:40 IST

आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

पुणे : विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सोमवारपासून (दि. १) बेमुदत बंद पुकारला आहे. पुण्यासह राज्यातील रेशनदुकानदार त्यात सहभागी होणार आहेत. देशपातळीवरही ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनने अशाच पद्धतीने बेमुदत बंद पुकारला आहे.

५० हजार रुपये मार्जिन इन्कम गॅरंटी, ३०० रुपये मार्जिन मनी, टूजी ऐवजी फोरजी मशीन, कालबाह्य नियम बदलणे, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबविणे तसेच कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करण्याची मागणी रेशन दुकानदारांनी करत हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील रेशन दुकाने बंद राहतील, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी दिली.

राज्यात सुमारे ५३ हजार रेशन दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. यापूर्वीच्या आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. त्यानंतर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन काळात महासंघाच्या निवेदनाची दखल घेत नागपूरला सचिवांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासन देण्यात आले. मात्र, निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्या वतीने नाईलाजास्तव एक जानेवारीपासून ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.बंदच्या काळात दुकानदारांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारे धान्याची उचल आणि वितरण करू नये. - गणेश डांगी, अध्यक्ष, पुणे शहर रेशन दुकानदार संघटना

टॅग्स :Puneपुणेfoodअन्नGovernmentसरकारagitationआंदोलनSocialसामाजिकMONEYपैसा