शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

‘सप्तश्लोकी गीते’चे दुर्मीळ हस्तलिखित पुस्तकरूपात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 3:16 PM

भगवद्गीतेतील एकाच श्लोकाचा विविध प्रतिभावंतांनी उलगडलेला आशय आणि केवळ सातच श्लोकांचा समावेश

ठळक मुद्देदुर्मीळ हस्तलिखित गवसले : भांडारकर संस्थेचे पटवर्धन यांची माहितीया प्रकल्पाच्या सिद्धतेसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार

पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेकडे असलेल्या हस्तलिखितांच्या संग्रहामध्ये ‘सप्तश्लोकी गीता’ हे दुर्मीळ हस्तलिखित गवसले आहे. भगवद्गीतेतील एकाच श्लोकाचा विविध प्रतिभावंतांनी वेगवेगळ्या काव्याविष्काराद्वारे उलगडलेला आशय आणि केवळ सातच श्लोकांचा समावेश असलेले अशा स्वरूपाचे हस्तलिखित हा अनमोल ठेवा अभ्यासकांना उपलब्ध करून देण्यासाठी पुस्तक निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती भांडारकर संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. भगवद्गीतेतील मूळ श्लोक, त्याच आशयाची वामन पंडित यांची समश्लोकी काव्यरचना, मोरोपंत यांची आर्या, तुलसीदास यांचे दोहे, मुक्तेश्वर यांची ओवी, संत तुकाराम महाराज यांचा अभंग आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची ‘भावार्थ दीपिका’मधील रचना अशा ‘सप्तश्लोकी गीता’ या दुर्मीळ हस्तलिखिताचे रूपांतर पुस्तकरूपामध्ये होत आहे. या पुस्तकाबरोबरच ओवी, अभंग, आर्या आणि दोहे यांच्या सुश्राव्य गायनाची सीडी देखील संस्थेतर्फे भेट दिली जाणार आहे.सुवाच्य हस्ताक्षरातील या हस्तलिखितावर कोणाचेच नाव नसल्यामुळे त्याचा लेखक कोण आणि कालखंड यावर प्रकाश पडत नाही. मात्र, वैयक्तिक संग्रहातून तसेच राज्यभरातील देवस्थानांकडून संस्थेकडे प्राप्त झालेल्या पोथ्यांमध्ये हे दुर्मीळ हस्तलिखित सापडले आहे. या ‘समश्लोकी गीता’ हस्तलिखिताला पुस्तक रूपामध्ये आणताना त्यातील काव्यप्रकारांच्या गायनाची सीडी देण्याचा संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाच्या सिद्धतेसाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या मराठी हस्तलिखितांच्या समग्र सूचीचे काम सुनीला गोंधळेकर करीत आहेत. ..........काव्यगायन सादर‘समश्लोकी गीता’ या पुस्तकाबरोबर देण्यात येणाºया ओवी, अभंग, आर्या आणि दोहे या काव्यगायनाला डॉ. गौरी मोघे यांचा स्वर लाभला आहे. त्या किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका पूर्णिमा भट-कुलकर्णी यांच्या शिष्या आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेbhandarkar institute puneभांडारकर संशोधन संस्था, पुणेhistoryइतिहास