खेड तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 18:27 IST2018-07-31T18:24:15+5:302018-07-31T18:27:08+5:30

पीडित मुलीची एक वर्षापूर्वी पीडित मुलीची योगेश यांच्याशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.

Rape on women by showing marriage attraction in Khed taluka | खेड तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार 

खेड तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार 

ठळक मुद्देतरुणीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर खेड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल

दावडी : लग्न आमिष दाखवून २२ वर्षीय तरुणीवर वर्षभर बलात्कार केल्याची घटना खेड तालुक्यात घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने आरोपीविरुद्ध फिर्याद दिल्यानंतर खेड पोलिस ठाण्यात बलात्कार गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत खेड पोलिस दिलेल्या माहितीनुसार, योगेश बजरंग डवणे (रा. नायफड, ता खेड ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीची एक वर्षापूर्वी पीडित मुलीची योगेश यांच्याशी मैत्री झाली. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर तिला लग्न आमिष दाखवून गेल्या वर्षभर लॉजवर नेऊन जुलै २०१७ ते ४ / ६ / २०१८ या कालावधीत तिच्यावर अनेकदा तिच्यावर बलात्कार केला.पीडित तरुणीने लग्नाची मागणी केली असता आरोपी योगेश यांने एका मुलीशी रजिस्टर लग्न केले असल्याचे सांगितले. मी तुझ़्याशी लग्न करणार नाही तुला काय करायचे ते कर असे पीडित तरुणीला सांगितले. सतत लग्नासाठी विचारणा करुनही आरोपीने लग्नाला नकार दिल्याने अखेर पीडित तरुणीने या याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी करित आहे.

Web Title: Rape on women by showing marriage attraction in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.