ओरडलीस तर ठार मारेन म्हणत मेहुणीवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 17:29 IST2019-05-25T17:27:42+5:302019-05-25T17:29:18+5:30
बहिणीच्या घरी राहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला मेहूण्याने गळा दाबून मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती एमआयडीसी परिसरातील एका गावात घडला.

ओरडलीस तर ठार मारेन म्हणत मेहुणीवर बलात्कार
सांगवी : बहिणीच्या घरी राहण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला मेहूण्याने गळा दाबून मारण्याची धमकी देऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती एमआयडीसी परिसरातील एका गावात घडला. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात मेहुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार पिडीत मुलगी ही तिच्या बहिणीच्य घरी राहण्यासाठी आली होती. उकाडा असल्याने सारे रोज बाहेर झोपायचे मात्र गुरुवारच्या सुमारास आरोपीने बाहेर विंचूकाटा असल्याची भिती घालत तिला एकटीलाच घरातील एका खोलीत झोपण्यास सांगितले. ती झोपलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने तिचा गळा दाबून ओरडलीस तर ठार मारेने अशी धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव हे अधिक तपास करीत आहेत