सासवडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चौघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:15 IST2017-11-23T01:15:38+5:302017-11-23T01:15:58+5:30

सासवड : येथील एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Rape of minor girl in Saswad | सासवडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चौघांवर गुन्हा दाखल

सासवडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चौघांवर गुन्हा दाखल

सासवड : येथील एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून त्याबाबत सासवड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित मुलगी शनिवारी (दि. १८) दुपारी १ च्या सुमारास सासवड येथील पालखीतळावर गेली असता त्या ठिकाणी रोहन जाधव (रा. सासवड) याने तिला नारायणपूर रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस काटवनात नेऊन बलात्कार केला. त्यानंतर जाधव याचे मित्र आदेश चौरे आणि संतोष माकर (दोघेही रा. सासवड) यांनी पीडित मुलीला दुचाकीवरून जेजुरी येथील एका लॉजवर आणून आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर या दोघांनी मुलीला अजय खोमणे (रा. सासवड) याच्या ताब्यात दिले, त्याने तिला वाघापूर येथील एका लॉजवर नेऊन बलात्कार केला असल्याची माहिती संबंधित मुलगी आणि तिच्या पालकांनी दिलेल्या जबाबातून सासवड पोलीस ठाण्यामध्ये दिली.
दरम्यान, पीडित मुलीची मंगळवारी (दि. २१) पुणे येथील ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता त्यामध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सासवड पोलीस ठाण्यामध्ये वरील
चार आरोपींवर भादंवि कलम ३७६ (ड), ३४ तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ६ ही कलमे लावली आहेत.

Web Title: Rape of minor girl in Saswad