शहरं
Join us  
Trending Stories
1
आता झेडपीची रणधुमाळी; १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांसाठी ५ फेब्रुवारीला मतदान, तर सातला निकाल
2
ट्रम्प प्रशासनासोबत भारताची महत्त्वाची चर्चा; ५०% टॅरिफचा फास सैल होणार?
3
आजचे राशीभविष्य, १४ जानेवारी २०२६: मकर संक्रांत, एकादशीचा दिवस कसा असेल? तुमची रास कोणती?
4
इस्त्रायलचा मोठा धमाका! संयुक्त राष्ट्रांच्या ७ संस्थांसोबतचे संबंध तोडले; पक्षपाताचा आरोप करत घेतला टोकाचा निर्णय
5
कुलाबा प्रकरणात अधिकाऱ्याची चूक दिसत नाही; निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्पष्टीकरण
6
भटका कुत्रा चावला तर जबर भरपाई द्यावी लागेल; न्यायालयाचा श्वानप्रेमी आणि राज्यांना कडक इशारा
7
मतदानाला मास्क घालूनच बाहेर पडा; मुंबईत विविध ठिकाणच्या प्रकल्पांमुळे हवेचा दर्जा घसरला
8
भारतावर पुन्हा एकदा २५% टॅरिफ? इराणशी व्यापार करणे पडणार महागात; ट्रम्प आणखी आक्रमक
9
शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण; अनुदानाबाबत विचारल्याने आला राग
10
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
11
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
12
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
13
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
14
तुम्ही दुबार मतदार असाल तर सादर करावे लागणार २ पुरावे; मतदान केंद्रावर हमीपत्र लिहून घेतले जाणार
15
अंबरनाथ, बदलापूरमध्ये स्वीकृत नगरसेवकपदावरून वादाची ठिणगी; शिंदेसेनेचे पारडे झाले जड
16
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
17
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
18
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
19
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
20
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिकेत १७ ते १८ तर पुण्यात २० जागा मिळाव्यात; रामदास आठवलेंची भाजपाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 20:32 IST

भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे

पुणे : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे. महापालिका निवडणुका महायुती म्हणून लढविल्या जाव्यात आणि त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाला योग्य जागा मिळाव्यात. मुंबई महापालिकेत १७ ते १८ तर पुणे महापालिकेत २० जागा मिळाव्या अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही एवढ्या जागांची मागणी भाजपकडे करणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले आहे. पुण्यात ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

आठवले म्हणाले, पुणे महापालिकेसाठी २० प्रभागांची यादी पक्षाने तयार केली असून ती भाजपाकडे सोपविण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ही यादी देण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आमच्या स्थानिक नेत्यांशी निवडणुकी संदर्भात चर्चा करावी आणि योग्य प्रतिनिधित्व द्यावे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुतीमध्ये प्रचारादरम्यान योग्य ती विधाने करावीत 

दीर्घ कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असल्यामुळे या निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त आहे आणि बंडखोरीचे प्रमाणही अधिक आहे. अनेक ठिकाणी महायुतीतील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. मात्र, या निवडणुकांच्या युती, आघाडीचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले गेले असले तरी देखील प्रचारादरम्यान महायुतीमध्ये बेबनाव निर्माण होईल अशी विधाने घटक पक्षांच्या स्थानिक अथवा प्रदेश पातळीवरील नेत्यांनी करू नयेत, असे आवाहनही आठवले यांनी केले.

अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल 

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी भारतीय अर्थव्यवस्था ही मृतावस्थेत असल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपात कोणतेही तथ्य नाही. संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेवर असताना भारतीय अर्थव्यवस्था दहाव्या क्रमांकावर होती. ती आता चौथ्या क्रमांकावर आली आहे. लवकरच की तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. याचे श्रेय निश्चितपणे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे आहे, असेही आठवले म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Athawale demands 17-18 seats in Mumbai, 20 in Pune from BJP.

Web Summary : Ramdas Athawale requests BJP for adequate representation in upcoming local elections. He seeks 17-18 seats in Mumbai and 20 in Pune municipal corporations. He also urged coalition partners to avoid divisive statements during campaigning for local elections.
टॅग्स :PuneपुणेRamdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारणMahayutiमहायुतीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMumbaiमुंबईMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक