सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को, भाजप उपोषणावर राजू शेट्टींची टिप्पणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:16 IST2018-04-12T19:16:00+5:302018-04-12T19:16:00+5:30

भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या देशव्यापी उपोषणावर विरोधकांनी चांगलेच तोंडसुख घेतले  आहे. राजू शेट्टींनी तर खिल्ली उडवत त्यांनी सेवाग्राम आश्रमात जाऊन प्रशिक्षण घ्यावे असेही सुचवले आहे. 

Raju Shetty's commented on BJP's hunger strike |  सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को, भाजप उपोषणावर राजू शेट्टींची टिप्पणी

 सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को, भाजप उपोषणावर राजू शेट्टींची टिप्पणी

ठळक मुद्देभाजपच्या उपोषणावर राजू शेट्टींची बोचरी टीका सेवाग्राम आश्रमात जाऊन प्रशिक्षण  घेण्याचा सल्ला

पुणे : विरोधकांनी अधिवेशन चालू दिले नाही म्हणून संपूर्ण देशभर सुरु असलेले भाजपच्या खासदारांच्या उपोषणावर स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे प्रमुख आणि खासदार राजू शेट्टी यांनी हे उपोषण म्हणजे 'सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को' अशा शब्दात खिल्ली उडवली आहे. विरोधी पक्षाने लोकसभा अधिवेशन चालू न दिल्याचा निषेध म्हणून पंतप्रधान मोदी यांच्यासह देशभरातील खासदारांनी आपआपल्या मतदारसंघात एकदिवसीय उपोषण केले. त्यावर पुण्यात शेट्टी यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या विषयावर भाष्य केले. शेट्टी म्हणाले की, उपोषण करण्यासाठी भाजप खासदारांनी वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमात जाऊन प्रशिक्षण घ्यावे. इतकेच नव्हे तर मी स्वतः अधिवेशनासाठी उपस्थित असताना विरोधक नव्हे तर भाजपचे खासदार अधिवेशन चालू देत नव्हते असा गौप्यस्फोट त्यांनी केला. हे उपोषण म्हणजे सौ चुहे खा कर बिल्ली चली हज को अशा शब्दात त्यांनी भाजपला फटकारले. 

 

 

 

Web Title: Raju Shetty's commented on BJP's hunger strike