शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

निर्मनुष्य रस्त्यांमुळे ' राजू' झालाय अस्वस्थ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 14:45 IST

ट्रॅफिक पोलिसांचे काम हलके व्हावे म्हणून चपळ गतीने धावपळ करणारा ' राजू ' सर्वांनीच कधीतरी पाहिला असेल!

पुणे : रोज त्याला माणसे पाहायची सवय. सख्ख असं त्याचं कुणीच नाही..पण कुणीतरी समोर आहे हाच काय तो आधार..मात्र आज कुणीच पाहायला मिळत नाही..कुणी तरी अन्न आणून देतं पण त्याची चव त्याला गोड लागत नाही...कारण आसपास कुणीच नाही...म्हणून तो आज काहीसा अस्वस्थ झालाय...फारस कुणाशी बोलत नाही...हे निर्मनुष्य रस्ते पाहून त्याचं जीवन ही काहीसं थांबलय....ही कहाणी आहे मनावर आघात झालेल्या ' राजू' ची!

शहरातील गर्दीच्या ठिकाणी ,ट्रॅफिक जाम असलेल्या चौकात मध्यभागी लोकांना हातवारे करणारा,हाती काठी, डोक्यावर टोपी अन अधूनमधून शिट्टी वाजवत उभा असलेला , ट्रॅफिक पोलिसांचे काम हलके व्हावे म्हणून रस्त्याच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चपळ गतीने धावपळ करणारा ' राजू  ' सर्वांनीच कधीतरी पाहिला असेल! कधी मगरपट्ट्याचा उड्डाणपूल तर कधी विमाननगर चौक...एक ठिकाणी त्याच वास्तव्य नाही...साहेब असा आवाज दिला कि गडी खुश होणार. सुशिक्षित अन शहाण्यांच्या जगाला नियम शिकवणारा तो तुमच्या नजरेत वेडा असला तरी त्याला जे समजते ते तुम्हाला कधीच समजत नाही. एरवी गदीर्ची सवय झालेला हा राजू सध्या निर्मनुष्य रस्ते अन सामसूम शहर पाहून पार बिथरलायङ्घ..त्याची ही करूण कहाणी प्रबोधन संस्थेच्या सचिन पाटील यांनी ' लोकमत' शी बोलताना उलगडली. शहरातील पूल अथवा सार्वजनिक ठिकाणी राहणाऱ्या अंध, अपंग, बेघर यांना जेवणाचे डबे देण्याचे काम प्रबोधन संस्था करीत आहे. ते म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून महिनाभरात यामधील बऱ्याच व्यक्तींशी संवाद साधायचा प्रयत्न करतो. मूड ठीक असेल तर ही मंडळी बोलतात नाहीतर आपल्या बोलण्याकडे त्यांचे लक्षही नसते. राजू हा त्यातलाच एक आहे. असाच एक विविध चौकात फिरणारा , मानसिक आघात झालेला , पण शहाण्यांच्या जगाला तो शिस्त लावू पाहत असतो , पण आज तो थबकलाय. अलीकडे तो फारसा बोलत नसायचा , कधी डबा खायचा तरी कधी तसाच पडून असे ,पण अचानक कधीतरी त्याचा मूड फिरतो ,कडक सलाम ठोकून तो  शिट्टी मारतो ....वाहतुकीचे नियम मोडणारी , रस्त्यावर कचरा फेकणारी अन सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणारी माणसे पाहिली की मला अश्याना शिस्त लावणारा राजू अधिक शहाणा वाटू लागतो , राजू बनून चांगले काम करणे चांगलेच आहे की! दोन घासानंतर त्याच्या डोळ्यात एक आत्मिक समाधान दिसते , सेल्फी अन डबे मोजणाऱ्या ना ते कसे दिसणार? ....असा मनाला चटका लावणाऱ्या  पाटील यांच्या प्रश्नाने अस्वस्थ केले. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीस