शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

राजगड, तोरणा, मढेघाट, धरण परिसर ३० सप्टेंबर बंद; पर्यटनाला मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 01:17 IST

उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई 

लोकमत न्यूज नेटवर्क, वेल्हे, राजगड तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या  तालुक्यातील किल्ले तोरणा, राजगड , तसेच पानशेत, वरसगाव, गुंजवणी धरण परिसर, मढे घाट धबधबा तसेच  महत्त्वाच्या ठिकाणी  तसेच  रविवारी (ता.२२) पासून ३० सप्टेंबर पर्यंत पर्यटनाला प्रशासनाने मनाई केली असल्याचा आदेश भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात दिले आहेत.

पर्यटन बंदीचे आदेश 22 जून रोजी दुपारी जाहीर झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. यामुळे सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी  गडावर व संबंधित पर्यटन स्थळावर गेलेल्या पर्यटकांना नाराज होऊन परतावे लागले .

पावसाळा सुरू झाले की पर्यटकांना वेध लागतात ते राजगड , तोरणा, लिंगाणा किल्ल्याच्या ट्रेकिंगसह गुंजवणी, पानशेत, वरसगाव, धरणासह तालुक्यातील छोट्या-मोठ्या धबधब्यांच्या ठिकाणी वर्षाविहार करण्यासाठी. मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारी पर्जन्यवृष्टी व डोंगर भागातील निर्माण होणारे धुके गडावर निर्माण पावसाळ्यात होणाऱ्या निसरड्या वाटा, घाटमाथ्यावरील असणारे अरुंद रस्ते तसेच त्या परिसरात कोसळणाऱ्या दरडी यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून या पार्श्वभूमीवर  तालुक्यातील पर्यटन स्थळांवर प्रतिबंध करणे,मढेघाट परिसरात रॅपलिंगला बंदी घालण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३, कलम १६३ अंतर्गत  राजगड तालुक्यातील  पर्यटनस्थळांवर २२ जून २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत  प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. 

किल्ले तोरणा, राजगड व मढेघाट गुंजवणी पानशेत वरसगाव परिसरामध्ये पर्यटनास मनाई असा फलक पुरातत्व खात्याचे पाहरेकरी बापु साबळे,पवन साखरे, आकाश कचरे, विशाल पिलावरे गडाच्या पायथ्याला पाल खुर्द येथे पाहरा देत होते. या वेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य तसेच वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

 आदेशातील बंदी असलेले महत्त्वाचे मुद्दे बुलेट मध्ये

- पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे

- धबधब्याच्या वर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहात खाली बसणे.

 - पावसामुळे धोकादायक झालेल्या ठिकाणांवर सेल्फी काढणे अथवा कोणत्याही प्रकारची चित्रीकरण करणे.

- वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे.

- नैसर्गिक ठिकाणी मद्यपान करणे ,मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे ,मद्य बाळगणे ,मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्यविक्री करणे, उघड्यावर मद्य सेवन करणे. 6)सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ काचेच्या व प्लॅस्टिकच्या बाटल्या थर्माकोल व इतर प्लास्टिकचे साहित्य इतरत्र फेकणे.

टॅग्स :Damधरण