Raj Thackeray: निवडणूक न घेता प्रशासक नेमून महापालिका ताब्यात ठेवण्याचा सरकारचा कट; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2021 11:09 AM2021-09-05T11:09:08+5:302021-09-05T11:09:39+5:30

Raj Thackeray: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

Raj Thackeray state Governments plan to appoint an administrator without holding elections | Raj Thackeray: निवडणूक न घेता प्रशासक नेमून महापालिका ताब्यात ठेवण्याचा सरकारचा कट; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

Raj Thackeray: निवडणूक न घेता प्रशासक नेमून महापालिका ताब्यात ठेवण्याचा सरकारचा कट; राज ठाकरेंचा गंभीर आरोप

googlenewsNext

Raj Thackeray: राज्यात महापालिका निवडणुका न घेता त्याठिकाणी प्रशासक नेमून महापालिकांचा कारभार देखील आपल्या ताब्यात ठेवण्याचा कट सरकार आखत असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि रणनिती आखण्यासाठी राज ठाकरे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज ते पुण्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. 

"राज्य सरकारलाच निवणुका नको आहेत. निवडणूक घेण्याची सरकारचीच इच्छा नाही. याकडे आपण गांभीर्यानं पाहायला हवं. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पुढे करुन निवडणुका लांबणीवर टाकण्याचा राज्य सरकारचा घाट सुरू आहे", असं राज ठाकरे म्हणाले. 

प्रशासक नेमून महापालिका ताब्यात घेण्याचा इरादा
"कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचं कारण देऊन निवडणुका लांबणीवर टाकायच्या. त्यानंतर महापालिकांवर राज्य सरकारकडून प्रशासक नेमून आपल्याच हातात महापालिका प्रशासन ठेवण्याचा सरकारचा इरादा आहे. खरंतर राज्य सरकारकडे पुरेशी यंत्रणा आहे. ठरवलं तर ओबीसी जनगणना केली जाऊ शकते", असं राज ठाकरे म्हणाले. 

ओबीसी जनगणना करा आणि निवडणुका घ्या
ओबीसी आरक्षण नसल्यामुळे निवडणुका स्थगित करण्याच्या निर्णयाला काहीच हरकत नाही. पण यामागे सरकारचं काही काळंबेरं असेल आणि आरक्षणाच्या मुद्द्याच्या आडून सरकार महापालिकांवर प्रशासक नेमून कारभार आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा विचार आपण करायला हवा, असं राज ठाकरे म्हणाले. ओबीसींची जनगणना करुन निवडणूक घेण्यास काहीच हरकत नाही, असंही ते म्हणाले. 

 

Web Title: Raj Thackeray state Governments plan to appoint an administrator without holding elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.