Raj Thackeray: राज ठाकरेंचे पुण्यातील भाषण सर्वात कमी वेळाच ठरलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2022 12:58 IST2022-05-22T12:58:21+5:302022-05-22T12:58:34+5:30
सकाळपासूनच कार्यकर्त्यांसहित नागरिकांनी सभेसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती

Raj Thackeray: राज ठाकरेंचे पुण्यातील भाषण सर्वात कमी वेळाच ठरलं
पुणे : पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे भाषण पार पडले. सकाळपासूनच कार्यकर्त्यांसहित नागरिकांनी सभेसाठी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. भाषण सुरु झाल्यावर सभागृह गर्दीने तुडुंब भरून गेल्याचे पहावयास मिळाले. राज ठाकरे अयोध्याच्या मुद्द्यावर बोलणार असे त्यांनी ट्विटद्वारे सांगितले होते. तर ते अनेक मुद्द्यांना हात घालतील. अशी प्रतिक्रिया मनसैनिकांनी दिली होती. मुंबई, ठाणे, औरंगाबाद या सभांमध्ये हिंदुत्व, भोंगे, आणि राज सरकारवर टीका अशा अनेक मुद्दयांना राज यांनी हात घातला होता. ती भाषणे पाऊण तासाच्या वर चालली होती. परंतु पुण्यातील भाषण हे इतर भाषणाच्या तुलनेत कमी वेळेच ठरलं आहे. आजच्या भाषणातही राज ठाकरे यांनी भोंगे हा विषय लावून धरला होता. त्याचप्रमाणे राणा दाम्पत्य, संजय राऊत, ओवेसी यांच्यावर टीकाही केली. पण शेवटी दुखापतीचे कारण देऊन त्यांनी सर्वांची रजा घेतली.
राज ठाकरे सभा सुरु होण्याअगोदर सभेला आलेल्या अंध विद्यार्थी सांभाळून व्यास पिठावर घेऊन येण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी भाषणाला सुरवात केली.
राज ठाकरे म्हणाले, सभांना काही हॉल वगैरे परवडत नाही. एसपी कॉलेजने नकार दिला . आम्हाला नाही तर कोणालाच नाही.असा सज्जड इशारा त्यांनी यावेळी दिला. नदीपत्राचा विषय झाला. बदलत्या हवामानामुळे नदी पत्रात सभा नको म्हंटल. सध्या निवडणुका नाही काही नाही उगाच भिजून कशाला भाषण करा. त्यापेक्षा गणेश कला क्रीडाला सभा घेऊ म्हंटल. पायाच्या दुखण्यावर १ जूनला शस्त्रक्रिया आहे. परवा अयोध्या दौरा रद्द केला त्यावरून अनेक जणांनी टीका केली. त्यानंतर मुद्दाम दोन दिवसांचा अवधी दिला कोणाला काय बोलायचं आहे ते बोलू द्या. मग आपण बोलू.
राणा दाम्पत्यावर टीका
हनुमान चालीसेचा विषय झाल त्यानंतर राणा मातोश्री म्हणजे मशीद आहे का? राणा आणि शिवसेना एकमेकांवर वाट्टेल ते बोलत होते. त्यानंतर लडाख मध्ये यांचं हिंदुत्त्व पकपक करण्यासारखं आहे. यांना दुसऱ्या गोष्टी काही नको. मुख्यमंत्र्यांची सभा झाली. त्यामध्ये हे हिंदुत्त्व खर की खोट आहे याचा शहानिशा सुरू झी आहे. हे काय चालले आहे. अशी टीका त्यांनी यावेळी केली.
भोंगे आंदोलनात पहिल्यांदाच 94 टक्के भोंगे आवाज कमी
भोंगे आंदोलन सुरू केलं आणि पहिल्यांदाच असं घडलं 94 टक्के भोंगे आवाज कमी झाले. तर काहींनी बंद केले हे आंदोलन एक दिवसाचा नाही विसरला की पुन्हा सुरू होणार त्यापेक्षा आताच तुकडा पडून टाका. आंदोलन होतील होत राहतळ काळजी नको टीम तयार आहे. दीड दोन महिन्यात भोंगा आंदोलन सुरू राहणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.