शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

पुण्यात पावसाने चार महिन्यांची सरासरी ओलांडली अडीच महिन्यांत ;आतापर्यंत ५७२ मिमी पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 22:43 IST

यंदा देशभरात सर्वत्र चांगला पाऊस.. 

ठळक मुद्देयंदा सरासरीपेक्षा तब्बल १६२ मिमी अधिक पावसाची नोंद

पुणे : मॉन्सून यंदा १०० टक्के बरसणार असा अंदाज हवामान विभागाने जूनच्या सुरुवातीलाच जाहीर केला होता. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा देशभरात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून पुणे शहरात पावसाने चार महिन्यांची सरासरी ओलांडली आहे.पुणे शहरात दरवर्षी पावसाळ्यातील जून ते सप्टेंबर या ४ महिन्यात सरासरी ५६० मिमी पाऊस पडतो.यंदा २२ ऑगस्टपर्यंत ५७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. २२ ऑगस्टपर्यंत पुणे शहरात सरासरी ६१३ मिमी इतका पाऊस पडत असतो. यंदा सरासरीपेक्षा तब्बल १६२ मिमी अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला कोकणात आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे शहरात जोरदार पाऊस पडला होता. त्यानंतर ठराविक दिवस शहरात पावसाने हजेरी लावली आहे.पहिल्या आठवड्यानंतर तिसऱ्या आठवड्यात शहरात जोरदार पाऊस झाला होता. जून महिन्यात तब्बल १९ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात शहरात अनेक दिवस पावसाचा खंड असतो. यंदा मात्र जुलै महिन्यात १८ दिवस पावसाचे होते. पहिले दोन आठवडे व त्यानंतर २३, २४, २५ जुलैला जोरदार पाऊस झाला होता. जुलै महिन्यात १२८ मिमी पावसाची नोंद झाली होती. जुलैमध्ये कमी पाऊस झाला असला तरी १ ऑगस्ट रोजी शहरात सरासरीच्या तुलनेत २१़९ मिमी अधिक पाऊस बरसला होता. ऑगस्ट महिन्यात अरबी समुद्रातील वारे बळकट झाल्याने कोकणासह मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातही जोरदार बरसात झाली असून त्यामुळे चार महिन्यातील सरासरी यंदा पावसाने एका महिना बाकी असतानाच ओलांडली आहे. ऑगस्ट महिन्यात देशभरात १०१ टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.पुणे शहरात वर्षभरात सरासरी ७६४ मिमी पाऊस होतो. हे पाहता गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही पावसाची वर्षाची सरासरी चार महिन्यातच ओलांडण्याची शक्यता आहे. लोहगाव येथे आतापर्यंत ६१.०४ मिमी पावसाची नोंद झाली असून ती सरासरीपेक्षा २६६ मिमीने अधिक आहे. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी