विदर्भात पावसाचा इशारा, देशावर फारसा परिणाम नाही 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 02:39 AM2020-11-23T02:39:52+5:302020-11-23T02:40:20+5:30

२५ नोव्हेंबरला तामिळनाडु व पाँडेचरी दरम्यान कराईकल आणि महाबलीपूरम दरम्यान किनार्यावर येण्याची शक्यता आहे.

Rain warning in Vidarbha does not affect the country much | विदर्भात पावसाचा इशारा, देशावर फारसा परिणाम नाही 

विदर्भात पावसाचा इशारा, देशावर फारसा परिणाम नाही 

Next

पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे गती या चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. मात्र, हे वेगाने पश्चिमेकडे येमेनच्या दिशेने जात आहे. त्याचा देशावर फारसा परिणाम होणार नाही. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. 

२५ नोव्हेंबरला तामिळनाडु व पाँडेचरी दरम्यान कराईकल आणि महाबलीपूरम दरम्यान किनार्यावर येण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम विदर्भातील अनेक जिल्ह्यात २५ नोव्हेंबर रोजी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३५.२ अंंश सेल्सिअस आणि सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ११.६ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

विदर्भात तुरळक पावसाची शक्यता 
n रराज्यात २५ नोव्हेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच २६ नोव्हेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.  

Web Title: Rain warning in Vidarbha does not affect the country much

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.