पुण्यातील ग्रामीण भागात पावसाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 06:06 PM2020-03-24T18:06:52+5:302020-03-24T18:14:06+5:30

पुणे जवळच्या ग्रामीण भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.

Rain started in rural areas of Pune rsg | पुण्यातील ग्रामीण भागात पावसाला सुरुवात

पुण्यातील ग्रामीण भागात पावसाला सुरुवात

Next

पुणे : काेराेनाचा प्रसार पुण्यात माेठ्याप्रमाणावर हाेत असताना पुणे शहराजवळील ग्रामीण भागात मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. दुपारी चारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले. संध्याकाळी 5.30 च्या सुमारास खानापूर व खडकवासला धरणाऱ्या साखळीत गारांसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. 

अवकाळी आलेल्या पावसामुळे छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले. काकडी, पालक, फुले, कोथिंबीर अशा भाज्यांचे नुकसान झाल्याने छोटे शेतकरी हतबल झाले आहेत. पुणे शहरात देखील ढगाळ वातावरण निर्मिती झाली असून वारा वाहत असल्याने पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील भारतीविद्यापीठ भागात देखील रिमझिम पावसाला सुरवात झाली आहे. दरम्यान पुढील चार दिवस राज्यात पाऊस हाेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 

 

Web Title: Rain started in rural areas of Pune rsg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.