शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

पैशांचा पाऊस तर पडलाच नाही, पण तब्बल ५२ लाखांना लागला चुना; भोंदू मांत्रिक जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 20:18 IST

जालन्याहून केली अटक, याप्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता...

पुणे : सावकारी करणार्‍या व्यावसायिकाला एका मित्राने एका मांत्रिकाची माहिती दिली. तो पैशांचा पाऊस पाडुन देतो, असे भासविले. पैशाच्या हव्यासापायी त्याने तब्बल ५२ लाख रुपये दिले. पण पैशांचा पाऊस काही पडला नाही. मांत्रिकाने आणखी पैशाचे मागितल्याने या सावकाराला मानसिक धक्का बसला. त्याने पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली. त्यानंतर चक्रे फिरली. जालना जिल्ह्यातून या भोंदू तांत्रिकाला पोलिसांनी सापळा रचून पकडले.किसन आसाराम पवार (वय ४१, रा. हिवरखेड, ता़ मंठा, जि़ जालना)  असे या मांत्रिकाचे नाव आहे. 

याप्रकरणी धायरीतील गणेशनगर येथील ४० वर्षाच्या व्यावसायिकाने सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांना त्यांच्या एका मित्राने जालन्यातील एक मांत्रिक पैशाचा पाऊस पाडत असल्याचे सांगितले. किसन पवार हा नेहमी पुण्यात येत असे. २०१६ च्या दरम्यान फिर्यादी यांनी त्याची भेट घेतली. त्यावेळी पैशाचा पाऊस पाडण्यासाठी काय करावे लागेल, याविषयी त्याने माहिती दिली. पैशांच्या पाऊस पाडण्यासाठी आपल्याला छोटीशी पुजा करावी लागेल आणि पुजेसाठी काही पैसे पुजेत ठेवावे लागतील, असे सांगून आपण खरे बोलत असल्याचे भासविले. मित्राचे म्हणणे आणि पवार याचा अविर्भाव पाहून फिर्यादीचा त्याच्यावर विश्वास बसला. पवार याने स्वत:मध्ये दैवी शक्ती असून चमत्कार करण्याचा दावा केला. फिर्यादी याने त्याला वेळोवेळी थोडे थोडे करुन तब्बल ५२ लाख १ हजार रुपये दिले. तरी त्यांना त्याची प्रचिती आली नाही. तेव्हा फिर्यादी यांनी पैसे देणे बंद केले. 

त्यानंतर नुकतेच पवार याने तुमचे काम झाले आहे. परंतु, एक शेवटचा विधी राहिला आहे, तो तुम्हाला करावा लागेल, असे सांगितले. त्याचा फिर्यादी यांना मानसिक धक्का बसला. त्यांनी तत्काळ गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्याकडे तक्रार केली. गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले. त्यांनी किसन पवार याची माहिती घेतल्यावर तो जालना जिल्ह्यातील गावी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक बनावट ग्राहक तयार केले. त्याबाबत खात्री पटल्यावर पोलिसांनी छापा टाकून पवार व त्याने तेथील सर्व वापरलेले साहित्य ताब्यात घेतले. त्याला पुण्याला आणून अटक करण्यात आली आहे. 

अशा प्रकारे किसन पवार याने आणखी काही जणांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे. कोणीही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये. पवार याने कोणाची फसवणूक केली असेल तर त्यांनी गुन्हे शाखेकडे माहिती द्यावी, असे पुणे पोलिसांनी आवाहन केले आहे. 

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे, उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, अंमलदार दीपक मते, महेश निंबाळकर, राजेंद्र मारणे, संदीप तळेकर, दीपक क्षीरसागर, प्रकाश कट्टे, सुजित पवार, संतोष क्षीरसागर, विल्सन डिसोझा, कल्पेश बनसोडे, रामदास गोणते, सोनम नेवसे यांनी केली आहे.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीArrestअटकPoliceपोलिसMONEYपैसा