शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज; पुढील २ दिवस कोकणात उष्णतेची लाट

By श्रीकिशन काळे | Updated: April 28, 2024 17:50 IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

पुणे : महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. सध्या कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. अशा वेळी हवेचे दाब कमी होऊन हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. परिणामी वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असते. अशी स्थिती असल्याने आज (दि.२८) व उद्या (दि.२९) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. 

राज्यामध्ये ३० एप्रिल ते ४ मे पर्यंत हवामान कोरडे राहील. कोकणात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तिथे आज (दि.२८) व उद्या (दि.२९) कोकणात यलो अलर्ट दिला आहे. विदर्भात बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह वादळी वारे वाहणार असून, त्यामुळे तिथेही आज व उद्या यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे परिसरात मात्र आकाश निरभ्र राहील आणि सायंकाळी ढगाळ वातावरण असेल. 

ज्यावेळी वारे हवेच्या अधिक दाबाकडून कमी दाबाच्या दिशेने जात असतात. तिथे मोठ्या प्रमाणावर ढग जमा होतात आणि पाऊस पडतो. त्या पावसाला पूर्वमोसमी पाऊस असे म्हटले जाते.  सध्या कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात कमाल व किमान तापमानात वाढ होत आहे. बहुतांशी भागांत कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे.  पुण्यात रविवारचे कमाल तापमान चाळीशीपार गेले आहे. परिणामी आज दुपारपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. तसेच किमान तापमान देखील चांगलेच वाढले आहे. वडगावशेरीला तर २९.९ किमान तापमानाची नोंद झाली आहे.

पुण्यातील किमान तापमान

वडगावशेरी - २९.९इंदापूर - २८.९मगरपट्टा - २८.६चिंचवड - २८.१कोरेगाव पार्क - २७.६हडपसर - २७.१लोणावळा - २४.२शिवाजीनगर - २३.८

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसTemperatureतापमानSocialसामाजिकHealthआरोग्यenvironmentपर्यावरण