शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
2
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
3
Top Marathi News LIVE Updates: कोलकाता विधानसभा निवडणूक दुसरा टप्पा: दुपारी १ वाजेपर्यंत ६१ टक्के मतदान
4
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
5
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
6
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
7
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
8
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
9
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
10
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
11
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
12
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
13
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
14
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
15
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
16
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
17
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
18
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
19
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
20
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस सुरू; वीज बंद

By admin | Updated: June 25, 2015 03:33 IST

सलग पडणाऱ्या पावसामुळे आता पिंपरी-चिंचवड शहर परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वाऱ्यामुळे विद्युत वाहिनीवर झाडे पडत आहेत.

सलग पडणाऱ्या पावसामुळे आता पिंपरी-चिंचवड शहर परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. वाऱ्यामुळे विद्युत वाहिनीवर झाडे पडत आहेत. काही ठिकाणी विद्युत वाहिनी तुटणे, भूमिगत केबल तुटण्यामुळे वीज गायब होत आहे. त्यामुळे शहरवासीय पुरते हैराण आहेत. दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यात कर्मचाऱ्यांच्या नाकी नाऊ येत आहे. शहर आणि ग्रामीण भागात ३ दिवसांपासून संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरात महावितरणकडून होणाऱ्या वीजपुरवठ्यामध्ये बिघाड होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही भागात तर रात्रभर वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे अंधारात राहण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अनेक भागात वीजपुरवठा दिवसांतून ४ ते ८ वेळा खंडित होत आहे. खासगी, तसेच शासकीय कार्यालयांमध्ये विजेअभावी अर्धवट कामांमुळे खोळंबा होत आहे. शहरामध्ये एकीकडे विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त असतानाच वारंवार कराव्या लागणाऱ्या दुरुस्तीच्या कामामुंळे महावितरणचे कर्मचारी हैराण आहेत. भूमिगत केबलला खोदकामांदरम्यान धक्का लागून आता त्याला पाणी लागल्याने अशा वाहिन्यांमध्ये दोष असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा वाहिन्यांमधील दोष शोधणे व त्या दुरुस्तीसाठी खोदकाम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. तळवडे, रुपीनगर या भागात दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. मंगळवारी दिवसभर हा त्रास सहन केल्यानंतर बुधवारी सकाळपासून हाच प्रत्यय रहिवाशांना आला. दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. निगडी प्राधिकरणातील काही भागांतही मंगळवारी रात्री वीज गायब होती. बिघाड दूर करण्याचे काम बुधवारी सकाळपर्यंत सुरूच होते. सकाळी दहाच्या सुमारास काही वेळ वीज आली. पुन्हा ती खंडित झाली.दुरुस्तीकामी नवीन कर्मचारी भरतीमहावितरणने पिंपरी, भोसरी आणि प्राधिकरण वीज उपकेंद्रांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. पिंपरी वीज उपकेंद्राच्या अखत्यारीत बोपखेल, कासारवाडी, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, पिंपरी, काळेवाडी, रहाटणी, वाकड, ताथवडे आदी मोठा भाग आहे. या भागात आधीचे २५० कर्मचारी कार्यरत आहेत. दुरुस्तीचा व्याप विचारात घेत ८० कर्मचाऱ्यांची भरती झाली आहे. भोसरी उपकेंद्रामध्ये नव्याने ६० कर्मचारी भरती झाली आहेत. प्राधिकरण उपकेंद्राच्या अखत्यारीत नवीन २० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)