ओव्हरहेड वायर मध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 20:07 IST2019-12-10T20:01:43+5:302019-12-10T20:07:03+5:30
तीन ठिकाणी ओव्हरहेड वायर शॉर्ट सर्किट झाल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतुक ठप्प

ओव्हरहेड वायर मध्ये बिघाड झाल्याने रेल्वे सेवा ठप्प
लोणावळा : मुंबई- पुणे लोहमार्गावर मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान डाऊन लाईनवर तीन ठिकाणी ओव्हरहेड वायर शॉर्ट सर्किट झाल्याने मुंबईहून पुण्याकडे येणारी वाहतुक ठप्प झाली आहे. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती समजल्यानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले असून दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. मंकीहिल ते ठाकूरवाडी दरम्यान पावसाळ्यापासून सातत्याने रेल्वे मार्गावर बिघाड होत आहे. रेल्वे मार्गावरील माती व पुल वाहून गेल्याने अप लाईन चार महिन्यांपासून बंद आहे. आता डाऊन लाईनला बिघाड झाल्याने काही लांब पल्ल्याच्या गाड्या कर्जत परिसरात थांबविण्यात आल्या आहेत. दुरुस्तीचे काम झाल्यानंतर रेल्वे वाहतुक सुरु होईल.