शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मटका अड्ड्यावर धाड, आमदार शेळकेंची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:28 IST

तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश नगरपंचायत प्रशासनाला दिले

वडगाव मावळ – वडगाव शहरात आमदार सुनील शेळके यांच्या जनसंवाद दौऱ्यात नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याबरोबरच त्यांनी अवैध मटका व दारूच्या अड्ड्यांवर छापे टाकत पोलिसांच्या साहाय्याने कारवाई केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अडचणींचे तात्काळ निराकरण केले.प्रभागनिहाय दौरा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्नविशाल लॉन्स, मोरया कॉलनी, पंचमुखी चौक, केशवनगर, आंबेडकर कॉलनी, संस्कृती सोसायटी यांसारख्या भागांना भेट देत आमदार शेळके यांनी रस्ते, गटार, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन यांसारख्या प्रश्नांवर नागरिकांची मते जाणून घेतली. यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश नगरपंचायत प्रशासनाला दिले. तसेच मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करून विकास प्रकल्प हाती घेण्याचे निर्देश दिले.मटका व दारू अड्ड्यांवर थेट कारवाईदौर्‍यादरम्यान, केशवनगर येथे नागरिकांनी रेल्वे लाइनजवळ सुरू असलेल्या मटका अड्ड्याची तक्रार केली. यावेळी आमदार शेळकेंनी घटनास्थळी धडक देत मटका अड्डा चालवणाऱ्या व्यक्तीला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. याशिवाय प्रभाग ४ मध्ये चालू असलेल्या दारू अड्ड्यावरही छापा टाकून कारवाई केली. दरम्यान, या दौऱ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शेळकेंनी शासकीय योजनांबाबत नागरिकांच्या अडचणी सोडवत अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच शेळकेंनी पोलीस प्रशासनाला वाढती गुन्हेगारी आणि तरुणांमधील व्यसनाधीनतेवर आळा घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच नागरिकांना देखील जागरूक राहण्याचे आवाहन केले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस