Pune: पेट्रोल भरण्यावरून पंपावर राडा; दरोडा पडल्याची पसरली अफवा, दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 10:15 IST2024-02-28T10:14:40+5:302024-02-28T10:15:38+5:30
पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा पेट्रोल पंपावर दरोडा पडला नसून पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन मारहाण झाल्याचे समोर आले...

Pune: पेट्रोल भरण्यावरून पंपावर राडा; दरोडा पडल्याची पसरली अफवा, दोघांना अटक
पुणे : महापालिकेसमोरील पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची चर्चा सोमवारी रात्री सोशल मीडियावर वेगाने पसरली. हे समजताच पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल, सहायक पोलिस आयुक्त वसंत कुंवर यांच्यासह शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत व त्यांचे सहकारी तातडीने पेट्रोल पंपावर पोहोचले. पेट्रोल पंपाचे मालक सचिन अनिल शहा हे जखमी झाल्याचे दिसत होते.
पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेतले. तेव्हा पेट्रोल पंपावर दरोडा पडला नसून पेट्रोल भरण्याच्या कारणावरुन मारहाण झाल्याचे समोर आले. सुरजितसिंग युवराजसिंग जुनी (वय २४) आणि जयसिंग जलसिंग जुनी (वय १९, दोघे रा. पाटील इस्टेट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत नवनाथ कचरु काळे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तिघांसोबत किरकोळ वाद झाला. यावेळी त्यांनी कामगारांना मारहाण केली. तेव्हा तेथे आलेल्या सचिन शहा यांच्या डोक्यात त्यांनी बांबूने मारहाण केली. तेथील साहित्याची तोडफोड करून ते पळून गेले. पोलिस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील तपास करीत आहेत.