कसब्यातील विजय रवींद्र धंगेकरांचा आहे; प्रकाश आंबेडकरांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 04:14 PM2023-03-05T16:14:09+5:302023-03-05T16:14:38+5:30

कसब्यात भाजपलाही खूप मतं मिळाली, हा महाविकास आघाडीचा नाही तर रवींद्र धंगेकरांचं विजय आहे

Rabindra Dhangekar victory in the town Prakash Ambedkar opinion | कसब्यातील विजय रवींद्र धंगेकरांचा आहे; प्रकाश आंबेडकरांचे मत

कसब्यातील विजय रवींद्र धंगेकरांचा आहे; प्रकाश आंबेडकरांचे मत

googlenewsNext

पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. तब्बल ३० वर्षानंतर भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने सत्ता मिळवून इतिहास घडवला. महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजयी मुसंडी मारत महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ०४० मतांनी पराभव केला. धंगेकर यांना ७३ हजार १९४ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. त्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने सर्वत्र जल्लोषही केला. त्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत आपले मत व्यक्त केले आहे. मला असं वाटतं की हा विजय रवींद्र धंगेकर यांचा असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. 

आंबेडकर म्हणाले, चिंचवडमध्ये एनसीपीचा उमेदवार नसता तर राहुल कलाटे निवडून आले असते असं का म्हणत नाही. काँग्रेस म्हणलं कसबा आम्ही लढवतो, राष्ट्रवादी म्हणलं की आम्ही चिंचवड लढवतो आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काहीच बोलले नाहीत. वंचित  आणि त्यांची युती आहे बाकीच्या बद्दल काही बोलणार नाही. भाजपला कसब्यामध्ये मतं कमी झालेली दिसत नाही. धंगेकर यांनी चांगली बांधणी केली म्हणून त्यांना अधिक मत मिळाली. मला असं वाटतं की हा विजय रवींद्र धंगेकर यांचा आहे. 

महागाई वाढत राहिली तर भविष्यात धोका 

Purchasing power of rupee हे स्थिर कसे राहायला पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न सरकार मध्ये आहे. हे मूल्य स्थिर राहिले नाही तर महागाई वाढत राहील. पगार जरी मोठा दिसत असला लोकांमध्ये तरी भविष्यात धोका आहे. गेल्या काही वर्षांपासून महागाई निर्देशांक वाढत चालला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

Web Title: Rabindra Dhangekar victory in the town Prakash Ambedkar opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.