शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

बंद शांततेत! रस्त्यावर उतरून निषेध, आठवडे बाजार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 2:43 AM

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आले.

पुणे - कोरेगाव भीमा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी मोर्चे काढून तसेच महामार्गावर रास्ता रोकोही करण्यात आले. काही ठिकाणचे आठवडे बाजारही बंद ठेवण्यात आले. एसटी बंदचा सर्वाधिकफटका प्रवाशांना बसला. बारामतीत लातूरहून सहलीला निघालेले ९० विद्यार्थी अडकले होते.बारामती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व दुकाने, व्यवहार संपूर्ण दिवसभर बंद होते. शहरात निषेधसभा घेण्यात आली.चाकण शहरात सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता. कार्यकर्त्यांनी आज दुपारी पुणे-नाशिक महामार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले. जुन्नर तालुक्यातील बौद्ध बांधवांच्या वतीने जुन्नर शहरात बंद, निषेध मोर्चा व रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नारायणगाव येथील पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करून हल्ला करणाºया समाजकंटकांचा जाहीर निषेध करण्यात आला. मंचर शहरातही पुणे-नाशिक महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.दौैंड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौैक आणि नगरमोरी चौैकात रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. इंदापुरात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शहरातील सर्व दैनंदिन व्यवहार १०० टक्के बंद होते. या बंदमधून रुग्णालये, शाळा, औषधालये वगळण्यात आली होती.कोरेगाव भीमा येथील जनजीवन सुरळीतकोरेगाव भीमा : येथे झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर जनजीवन सुरळीत होत असताना अद्यापही नागरिक तणावाखालीच असल्याचे चित्र आहे. आज नागरिकांनी रस्त्यावरील जळालेली वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला काढली. सणसवाडीमध्येही मंदिराची साफसफाई करण्यात आली होती.परिसरात अनेक ठिकाणी विविध पक्ष, संघटनांचे मेळावे होत असून या मेळाव्यांमध्ये बाहेरून येणाºया व्यक्ती , प्रतिनिधी प्रक्षोभक भाषणे, विचार व्यक्त करीत असल्याने येथील परिस्थिती तणावाखाली आहे. याबाबत कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक आचारसंहिता करता येईल का? याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.कोरेगाव भीमाचे मंडलाधिकारी कावळे यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पंचनामे करण्याबाबत अद्याप निर्देश दिले नसल्याचे सांगितले. तहसीलदार रणजितभोसले यांनी उद्यापासुन पंचानामे करण्यास सुरुवात करणार असल्याचे सांगितले.जमावबंदी आज संपणारकोरेगाव भीमा, वढू बुद्रुक, सणसवाडी, शिक्रापूर परिसरात १ जानेवारीपासून जमावबंदी घोषित करण्यात आली होती. दरम्यान येथील परिस्थिती आज नियंत्रणात आली असल्याने रात्री १२ पासून जमावबंदी उठवणार असल्याचे तहसीलदार रणजित भोसले यांनी सांगितले.आठवडे बाजार बंद राहणारकोरेगाव भीमाची परिस्थितीजरी नियंत्रणात आलीअसली व जमावबंदी उठवणार असले तरी कोरेगाव भीमाचाउद्या (दि. ४) असणारा आठवडे बाजार बंद राहणार असल्याचे तहसीलदार रणजीत भोसले यांनी सांगितले.दंगलीत स्थानिकांचे मोठे नुकसान झाले असून भरपाईबाबत तसेच घडलेल्या दुर्घटनेबाबत स्थानिकांची असणारी बाजू मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार आहे. याबाबत प्रतिबंधात्मक आचारसंहिता करता येईल का? याचीही चर्चा करणार आहे. - बाबूराव पाचर्णे, आमदार, शिरूर-हवेलीकोरेगाव भीमाची घटना म्हणजे राजकारण : आढळरावमंचर : कोरेगाव भीमाची घटना ही मराठा समाज आणि दलित समाजात भांडणे लावण्यासाठीचे राजकारण असल्याचा आरोप शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज लोकसभेत केला. सर्व नागरिकांनीकुठल्याही अफवांना बळी न पडता शांतता राखावी, असे आवाहन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. कोेरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दगडफेकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. आज लोकसभेत यावरून विरोधी पक्षांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. यावेळी आढळराव पाटील यांनी या प्रकरणाचा दलित किंवा मराठा समाजाचा संबंध नसून केवळ राजकारणासाठीहे सगळे चालले असल्याचा आरोप केला. आढळराव पाटील म्हणाले, की कोरेगाव भीमा लढाईला २०० वर्षांचा इतिहास आहे. हा भाग शिरूर लोकसभा मतदारसंघात येतो. या ठिकाणी गेल्या ९० वर्षांपासून विजयस्तंभ अभिवादन दिन साजरा केला जातो. यावर्षी १ जानेवारीला इथे हिंसाचार झाला. काहीजण जाणूनबुजून दलित आणि काही मराठी समाजात भांडणे लावण्याचा या मार्गाने प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकारने या प्रकरणाच्या सखोल चौकशीच्या सूचना महाराष्ट्र शासनाला कराव्यात. हिंसाचार रोखण्यात महाराष्ट्र पोलीस कमी पडले.

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावMaharashtra Bandhमहाराष्ट्र बंद