शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

पुणे महापालिका आयुक्तांच्या समोरच दोन ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी; तळजाई येथील वादग्रस्त प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 19:06 IST

पालकमंत्र्यांच्या सूचनेवरुन आयुक्तांनी बोलावली होती बैठक

ठळक मुद्देतळजाई टेकडीवर १०८ एकरांमध्ये ‘ऑक्सिजन पार्क’उभारण्यात येणार

पुणे : तळजाई टेकडीवर पार्किंग शेड उभारुन त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याविषयासंदर्भात पालकमंत्र्यांच्या सूचनेवरुन पालिका आयुक्तांनी बोलावलेल्या बैठकीमध्ये दोन ज्येष्ठ नगरसेवक एकमेकांना भिडले. एकमेकांना ढोंगी, सोंगी, बदमाश, चोर म्हणण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. हमरीतुमरीवर आलेल्या दोघांनाही महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मध्ये पडत शांत करण्याच्या प्रयत्न केला. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास आयुक्तांच्या कक्षातच हा प्रकार घडला. या विषयाची चर्चा दिवसभर महापालिकेत रंगली होती.तळजाई टेकडीवर १०८ एकरांमध्ये ‘ऑक्सिजन पार्क’ (वन उद्यान) उभारण्यात येणार असून त्यातील काही क्षेत्रावर पार्किंगशेड उभारुन त्यावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार होता. मात्र याठिकाणी वनउद्यानाचे आरक्षण असल्यामुळे याठिकाणचा सौरऊर्जा प्रकल्प शक्य नसल्याने हा प्रकल्प रद्द करण्यात आला होता. ग्रेसचे नवनियुक्त गटनेते आबा बागूल यांनी याविषयी गेल्या आठवड्यात पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन याविषयाची माहिती दिली. त्यावेळी ज्येष्ठ नगरसेवक सुभाष जगताप तेथे उपस्थित होते. पवार यांनी दोघांचेही म्हणणे ऐकून घेतल्यावर पालिका आयुक्तांना स्थानिक आमदार, सर्व नगरसेवक यांची एकत्र बैठक घेण्याच्या सूचना दिल्या. आयुक्त यांनी बागूल व जगताप यांना याविषयावर चर्चा करण्याकरिता कार्यालयात बोलाविले होते.चर्चा सुरु असताना याविषयावरुन वादाची ठिणगी पडली. बागूल यांनी हा प्रकल्प करणे कसे आवश्यक आहे हे सांगत बजेटमध्ये तरतूद करण्याची मागणी केली. तर, जगताप यांनी त्यांचे मुद्दे खोडून काढत या प्रकल्पाला मान्यता नाही. तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प योग्य नसून हिलटॉप, हिलस्लोप आणि पार्क संदभार्तील निर्णय शासन दरबारी प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. प्लॉटधारकांनी पालिकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आणि नुकत्याच पालिकेच्या बाजुने लागलेल्या निकालाचा संदर्भही जगताप यांनी दिली. हा वाद सुरु असताना बागूल यांनी आम्ही निवडून आलेलो नगरसेवक असून स्विकृत नाही अशी टिपण्णी केली. त्यावरुन,  जगताप यांनी बागूल यांनी कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या 15 प्रकल्पांपैकी 13 प्रकल्प बंद असल्याचे म्हटले. त्यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. एकमेकांना अरे-तुरे वरुन बोलताना एक दम  वाद पेटला. एकमेकांना ढोंगी, सोंगी, चोर, बदमाश असे संबोधण्यापर्यंत वाद विकोपाला गेला. यावेळी काही अधिकारीही तेथे उपस्थित होते. परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पालिका आयुक्तांनी दोघांच्या मध्ये पडत हा वाद शांत केला. 

टॅग्स :PuneपुणेTaljai Tekdiतळजाई टेकडीcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका