शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

शालेय साहित्याच्या खरेदीसाठी विद्यार्थ्यांच्या खात्यात होणार थेट रक्कम जमा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 1:34 PM

विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य घेता यावे याकरिता पालिकेने दोन वर्षांपासून थेट पालकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली..

ठळक मुद्देपालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये ९४ हजार ४०० विद्यार्थीबालवाडीपासून मोठ्या गटापर्यंतच्या १६ हजार विद्यार्थ्यांना इयत्तेप्रमाणे पैसे देण्यात येतात..बँकांनी कापले काही पालकांचे पैसे बँकाना पत्र पाठवून विद्यार्थ्यांची खाती झिरो बॅलेन्स करावीत अशी मागणी करणारगेल्या वर्षी पाच हजार विद्यार्थ्यांची माहिती चुकल्याने पैसे परत आले

पुणे : पालिकेच्या शाळा येत्या १७ जूनपासून सुरु होणार असून विद्यार्थ्यांच्या खात्यावर शालेय साहित्याच्या खरेदीसाठी डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्यात येणार आहे. ही रक्कम ३० जूनपर्यंत जमा होईल अशी माहिती शिक्षण प्रमुख शिवाजी दौंडकर यांनी दिली.पालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या शाळांमध्ये ९४ हजार ४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. बालवाडी पासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश यामध्ये आहे. विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके, वह्या व अन्य शालेय साहित्य घेता यावे याकरिता पालिकेने दोन वर्षांपासून थेट पालकांच्या खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. त्याआधी पालिका निविदा मागवून शालेय साहित्याचे वाटप करत असे. परंतू, आर्थिक गैरव्यवहार आणि साहित्याचा दर्जा याविषयी शंका उपस्थित होऊ लागल्याने डीबीटी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी डीबीटीच्या नियोजनाची बैठक अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. बैठकीमध्ये गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या डीबीटी योजनेचा आढावा घेण्यात आला. या योजनेमुळे पालक शहरामधील कोणत्याही दुकानामधून साहित्याची खरेदी करु शकतात. काही पालकांनी जमा झालेले सर्व पैसे खर्च केले नसल्याचेही समोर आले आहे. या योजनेतील त्रुटी दूर करण्यात येणार असल्याचे दौंडकर यांनी सांगितले. बालवाडीपासून मोठ्या गटापर्यंतच्या १६ हजार विद्यार्थ्यांना इयत्तेप्रमाणे पैसे देण्यात येतात. प्रशासनाकडे एकूण ९५ टक्के विद्यार्थ्यांच्या बचत खात्यांची माहिती असून नवीन विद्यार्थ्यांची माहिती शाळा सुरु झाल्यावर घेण्यात येणार असल्याचे दौंडकर म्हणाले. ====बँकांनी कापले काही पालकांचे पैसेकाही पालकांच्या खात्यावर परिस्थितीमुळे पैसेच नसतात. बँक खात्यामध्ये किमान काही रक्कम ठेवावी लागते. त्यापेक्षा कमी रक्कम असल्यास बँका पैसे कापून घेतात. अनेक पालकांच्या खात्यावर पालिकेने जमा केलेल्या पैशातून बँकेने पैसे कापून घेतले. महापालिका अतिरिक्त आयुक्त बँकाना पत्र पाठवून विद्यार्थ्यांची खाती झिरो बॅलेन्स करावीत अशी मागणी करणार आहेत. ====गेल्या वर्षी पाच हजार विद्यार्थ्यांची माहिती चुकल्याने पैसे परत आले होते. त्यापैकी चार हजार विद्यार्थ्यांचे पैसे परत त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यावेळी अशी चूक घडू नये याकरिता कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :PuneपुणेbankबँकSchoolशाळाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका