शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

महिला कर्मचाऱ्यांना ‘वाड्यावर या’ म्हणणार्‍या पोलीस उपनिरीक्षकाला मिळाली ' ही ' शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 9:55 PM

महिला पोलिसांनी याबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती.

ठळक मुद्देशिवाजीनगर पोलिस मुख्यालयातील प्रकार

पुणे : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना वाड्यावरती भेटायला या असे बोलणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अपर पोलीस आयुक्तांनी शिक्षा सुनावली आहे.शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक अशोक टोके असे त्यांचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी,  टोके हे पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. ते तेथे काम करणार्‍या महिला पोलीस कर्मचार्‍यांना तुम्ही वाड्यावरती भेटायला या असे म्हणत असे. याबाबत या महिलांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार केली होती. या तक्रार अर्जांची सहायक पोलीस आयुक्तांनी चौकशी केली. त्याचा चौकशी अहवाल अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी सादर केला होता. अशोक टोके यांनी दिलेला खुलासा समाधानकारक वाटला नाही. वाडा हा शब्दप्रयोग महिला बाबतीत करणे उचित नसून चौकशी अहवालामध्ये टोके यांची कसुरी निष्पन्न झाली आहे. त्यामुळे त्यांना १ वर्षे वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता गमतीतही कोणी वाड्यावर या असे म्हणू नये.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcommissionerआयुक्त